Crime News esakal
मुंबई

Mumbai Crime : धारावीत मारहाणीत एकाचा मृत्यू, पोलीसांकडून आरोपीला अटकेत

चार आरोपींपैकी एका आरोपी फिरोज शेख धारावी पोलिसांनी अटक केली असून त्याच्या मार्फत इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime - धारावी परिसरात एक 35 वर्षीय व्यक्तीला शुक्रवारी एका गटाकडून मारहाण झाली. या मारहाणीत पिडीत संजय जाधवचा मृत्यू झाला. यानंतर धारावी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

जाधवची पत्नी शुभांगी जाधव यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. फिरोज शेख, कासिम कॉन्ट्रॅक्टर, बबलू, एहसान या आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला असून याप्रकरणी शनिवारी फिरोज शेख या आरोपीला पोलिसांनी अटक केली. इतर 3 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

संजय जाधव राजीव गांधी नगर येथील ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवासी होता. 31 मे रोजी मद्याच्या नशेत घराच्या बाजूला काम सुरू असलेल्या बांधकाम इमारतीच्या ठिकाणी गेला होता. त्यावेळी आरोपींनी जाधव याला तेथून जाण्यास सांगितले. पण दारूच्या नशेत असल्यामुळे आरोपी व जाधव यांच्यात वाद झाला.

त्यातून आरोपीने लाथा-बुक्क्याने केलेल्या मारहाणीत जाधव खाली कोसळला. या प्रकरणी पत्नी शुभांगीच्या तक्रारीवरून शुक्रवारी धारावी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. चार आरोपींपैकी एका आरोपी फिरोज शेख धारावी पोलिसांनी अटक केली असून त्याच्या मार्फत इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT