Mumbai Crime News esakal
मुंबई

Mumbai Crime News : मुंबईतल्या चुनाभट्टी परिसरात गोळीबार, तीन जखमी

ज्या भागात हा गोळीबार झाला तो रहिवासी भाग आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मुंबईतल्या चुनाभट्टी परिसरामध्ये एकाने अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे.

गोळीबाराच्या घटनेतील जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत सोळा ते सतरा राऊंड फायर झाल्याचं सांगितलं जात आहे.

एका गुंडाचा दुसऱ्याशी पूर्ववैमनस्यातून वाद झाला आणि नंतर गोळीबार झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून वेगाने तपासकार्य सुरु आहे.

ज्या भागात हा गोळीबार झाला तो रहिवासी भाग आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. 'टीव्ही ९' ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

SCROLL FOR NEXT