Mumbai Crime  sakal
मुंबई

Mumbai Crime: न्हावा शेवा बंदरातून 10 कोटीच्या परदेशी सिगारेट साठा जप्त

Mumbai Crime: जप्त करण्यात आलेल्या सिगारेटची अंदाजे किंमत 10.08 कोटी रुपये इतकी आहे. या संदर्भातला पुढील तपास सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime: महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटच्या कारवाईत 10.08 कोटी रुपये किंमतीच्या परदेशी सिगारेट असल्लेला कंटेनर जप्त करण्यात आल्या.दोन कंटेनरमध्ये गालिच्याखाली सिगरेटचा साठा दडवून ठेवला होता.

गुप्त माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय पथकाने संयुक्त अरब अमिराती बंदरातून आयात करण्यात आलेल्या मालाचे दोन  कंटेनर रोखले. पहिल्या कंटेनरची सविस्तर तपासणी केल्यावर, परदेशी-ब्रँडच्या विशेषत: एस्से चेंज  सिगारेटचा साठा मिळाला.

कापडाच्या गुंडाळ्यामध्ये सिगारेटच्या एकूण 67,20,000 कांड्या लपवून ठेवल्या होत्या. जुन्या आणि वापरलेल्या गालीचांसह सर्व मुद्देमाल तात्काळ जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या सिगारेटची अंदाजे किंमत 10.08 कोटी रुपये इतकी आहे. या संदर्भातला पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT