Crime sakal
मुंबई

Mumbai Crime: जीम ट्रेनरचा तरुणावर हल्ला, तरुण गंभीर जखमी!

Mulund Crime: आरोपी प्रशिक्षक जखमी तरुणाकडे रागाने पहात होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime: मुंबई - व्यायामशाळेत प्रशिक्षाकाने अन्य तरुणाला डोक्यात मुद्गल घालत गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी पहाटे मुलुंड पूर्वेकडील फिटनेस इंटेलिजेंस जीममध्ये घडली. जखमी तरुणाच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी गुन्हा नोंदवत प्रशिक्षक धरव नाकेर याला अटक केली.

प्राथमिक चौकशीतून जखमी आणि आरोपी यांच्यातील नेमका वाद स्पष्ट झालेला नाही. मात्र हल्ला घडण्याआधी आरोपी प्रशिक्षक जखमी तरुणाकडे रागाने पहात होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

जखमी तरुणाचे नाव युगेश शिंदे(२०) असे असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. युगेशचे वडील रेल्वेत मोटरमन असून आई वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून युगेश या व्यायामशाळेचा सदस्य आहे. बुधवारी मोहरम निमित्त सुटी असल्याने तो पहाटेच व्यायामशाळेत आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

व्यायामशाळेत लागलेल्या सीसीटिव्हीत हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम कैद झाला असून तपासासाठी पोलिसांनी हे चित्रण ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT