Mumbai Crime  sakal
मुंबई

Mumbai Crime : उल्हासनगरमध्ये पती-पत्नीने तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत संपवलं जीवन

कलानी यांचे स्वीय सहाय्यक राहिले होते

शर्मिला वाळुंज

उल्हासनगर - उल्हासनगर मधील आशेळेपाडा परिसरात राहणारे नंदकुमार ननावरे यांनी आपल्या पत्नीसह गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ननावरे यांनी माजी आमदार पप्पू कलानी व ज्योती कलानी यांचे स्वीयसहायक म्हणून काम पाहिले होते. सध्या ते कलानी कुटुंबाचे ते मंत्रालयातील कामे पाहत होते.

ननावरे यांनी अचानक हे टोकाचे पाऊल का उचलले याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नंदकुमार ननावरे हे आपल्या परिवारासह उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील आशेळेपाडा परिसरात राहत होते.

मंगळवारी दुपारी त्यांनी पत्नी उर्मिला हिच्यासह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले आहेत. या घटनेनंतर आशेळेपाडा परिसरात शोककळा पसरली आहे. ननावरे दांपत्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप देखील समजले नसून पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे.

कॅम्प नं-४, आशेळेगाव नागराणी मंदिर मागे नंदू ननावरे हे पत्नी आणि मुला मुलीसह तीन मजल्याच्या घरात राहत होता. ननावरे यांनी माजी आमदार पप्पू कलानी व ज्योती कलानी यांचे स्वीयसहायक म्हणून काम केले असून आजच्या स्थितीत कलानी कुटुंबाचे मंत्रालयातील कामे पाहतं होते अशी चर्चा आहे. तसेच मंत्रालयातील कामानिमित्त शिवसेना आणि शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांच्याकडे जाणे येणे होते, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Paper Leak: ज्याला मानलं जात होतं पेपरफुटीचा 'मुख्य सूत्रधार', त्यालाच CBI ची क्लीन चिट; चार्जशीटमध्ये नेमकं काय?

Education Ministry latest news : मोठी घडामोड! विनीत जोशींची उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदावरून हकालपट्टी

Latest Marathi News Live Update : 'तावडे हॉटेल' अतिक्रमणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार

Nagpur High Court: महिनाभरात सर्व प्रकरणांची उत्तरे देऊ; उच्च न्यायालयात नगरविकास विभागाची ग्वाही

Nagpur Farmers Protest: संतापलेल्या शेतकऱ्यांकडून रस्त्यावरच धान रोवणी ; ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराचा नोंदवला निषेध

SCROLL FOR NEXT