mumbai crime news attack on police officer with blade in cuff parade Mumbai accused arrested sakal
मुंबई

Mumbai Crime : मुंबईत कफ परेड परिसरात पोलीस अधिकाऱ्यावर ब्लेडने हल्ला; आरोपी अटकेत

दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात शनिवारी रात्री पोलीस उपनिरीक्षकावर ब्लेडने वार केल्याची घटना घडली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात शनिवारी रात्री पोलीस उपनिरीक्षकावर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुलाम मुस्तफा शेखला अटक केली असून आरोपीविरोधात विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

या घटनेत जखमी पोलीस उपनिरीक्षक रुपेशकुमार भागवत कफ परेड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.आरोपी शेखला ताब्यात घेण्यासाठी गेले असता पोलिसांवर आरोपीने ब्लेडने वार केले. आरोपीला पोलीस त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याची पोलिसांकडून माहिती मिळत आहे.

जखमी पोलीस अधिकाऱ्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. आरोपी गुलाम मुस्तफा शेख वर्ल्ड ट्रेड सेंटर परिसरात असल्याची कफ परेड पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यावेळी त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक गेले असता आरोपी शेखने ब्लेड काढून धाक दाखवत धमकी देऊ लागला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेत असताना पोलीस उपनिरीक्षक रुपेशकुमार भागवतांवर त्याने ब्लेडने हल्ला केला. त्यात भागवत यांच्या हाताला तीन ते चार जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी आरोपी शेखला अटक करण्यात आली असून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीविरोधात यापूर्वी हत्या, पोलिसांवर हल्ला व अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 5 गुन्हे दाखल आहेत. आरोपीची मानसिक स्थिती ठीक वाटत नसून त्याला उपचारासाठी ठाणे येथील मध्यवर्ती मनोरुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs DC Live: विराट कोहली अपयशी ठरला, वैभव सूर्यवंशीचा 'पॉवर'फुल विक्रम थोडक्यात वाचला! १५ वर्षीय फलंदाज वरचढ ठरला

Inflation Rise: IMD चा कमी पावसाचा इशारा! शेती संकटात? महागाई वाढणार का?

Latest Marathi News Live Update: ठाण्यातील टेंभी नाका आनंद आश्रम येथे शिवसेना जाहीर निषेध आंदोलन

बिग बॉस मराठीच्या घरात गायक अभिजीत सावंतची ENTRY ! घरातील स्पर्धकांना केलं गाण्याने मंत्रमुग्ध ..

Supreme Court : ४२ वर्षांनंतर ताजमहल केस नंबर १३३८१ संपली! १९८४ दाखल झालेल्या या याचिकेत नेमकं काय होतं? खरं कारण माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT