मुंबई

Mumbai Crime News: दारुड्या बापाने 10 वर्षाच्या मुलीचे जीवन संपवले

Mumbai Crime News : मुलगी गतिमंद असल्याने केली हत्या

शर्मिला वाळुंज

Mumbai Crime News: दारूच्या नशेत बापाने गतिमंद असलेल्या आपल्या 10 वर्षीय मुलीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली परिसरात घडली आहे. हत्या करून पसार झालेल्या या बापाला मानपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासात शोध घेऊन अटक केली आहे.

मनोज अग्रहरी (वय 35) असे अटक आरोपीचे नाव असून त्याने हत्या केल्याची कबुली दिली असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली आहे. दारूचे व्यसन, चार मुली, काम धंदा काही नसल्याने दारूच्या नशेत त्याने ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनोज हा त्याची पत्नी लीलावती व 4 मुलींसह राहण्यास आहे. घरची परिस्थिती हालाखीची...चार मुली...हाताशी काम धंदा नाही...दारूचे लागलेले व्यसन...त्यातच दुसरी मुलगी गतिमंद होती. तिच्यावर ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र जवळ पुरेसा पैसा नसल्याने उपचार पूर्ण होत नव्हते.

मनोज हा किराणा मालाच्या दुकानात मिळेल ते काम करत होता. दारूच्या नशेत तो अनेकदा पत्नी व विशेष मुलीस मारहाण करत असे. नुकतीच त्याने मुलीला कंबरेत मारहाण केली असल्याची माहिती मुलीची आई लीलावती हिने पोलिसांना दिली आहे. या मुलीचा काही उपयोग नाही, तिला मरावेच लागेल, अशी भाषा तो सतत करत असे.

रविवारी संध्याकाळी मनोज दारू पिऊन घरी आला. दारूच्या नशेत त्याने मुलीचा ओढणीने गळा दाबून तिची हत्या केली. शेजाऱ्यांना याची कुनकुन लागताच त्यांनी कंट्रोलला फोन करून याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार मानपाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान मनोज याने पत्नी लिलावती ही एमआयडीसीत काम करत असलेल्या ठिकाणी गेला.

तेथील कर्मचाऱ्यांना लिलावती हिला तातडीने घरी जाण्यास सांगा आणि मुलगी मयत झाली आहे असा निरोप दिला. तेथून दारुड्या मनोजने पळ काढला. कर्मचाऱ्यांनी मुलीची आई लिलावतीला घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून लिलावतीने तातडीने घरी पळ काढला. तेव्हा मुलगी बिछान्यावर निपचित पडली होती.

पती मनोजने आपल्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त करत तिने मानपाडा पोलीस ठाण्यात मनोज याच्या विरोधात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत मनोज याचा शोध घेत मध्यरात्री त्याला अटक केली.

मनोज याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal TMC Politics: पश्चिम बंगालमधील राजकीय भूकंपानंतर भाजपने दिली पहिली प्रतिक्रिया; नवीन गट सत्तेत जाणार का?

Solapur MLC Election : सोलापूर विधान परिषदेत मोठा गेम! काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद; एका सहीमुळे संपूर्ण निवडणूक फिरली? फत्तेपूरकरांनी उच्च न्यायालयात घेतली धाव

Baba Vanga Prediction: शेवटच्या ७ महिन्यात 'हे' लोक होणार मालामाल! बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत; कोणत्या राशींना होणार लाभ?

Karad Bridge Opening : पुणे -कोल्हापूर महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज, कऱ्हाडचा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होण्याची तारीख ठरली

'या' आद्याक्षराने नाव सुरु होणारे लोक असतात स्वतःच्या मर्जीचे मालक ! अत्यंत हुशार आणि श्रीमंत होणारे लोक

SCROLL FOR NEXT