Mumbai Crime News esakal
मुंबई

Crime News : आर्थर रोड तुरुंगात कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार; दोन कैद्यांविरोधात गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात एका कैद्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली आहे. अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या दोन कैद्यांनी हा प्रकार केला आहे.

समीर शब्बीर शेख ऊर्फ पुडी व राशीद हसन फराज अशी आरोपींची नावे आहेत. याशिवाय आरोपींनी तक्रारदाराला मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार 7 जूनला हा प्रकार घडला आहे. तसेच 9 जूनला आरोपीने तक्रारदाराला मारहाण केल्याची पोलिसांकडून माहिती मिळत आहे. दोन्ही आरोपींना अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर दोन्ही आरोपींना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते.

आरोपींनी स्नानगृहात एका 23 वर्षीय कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी बराकमध्ये या कैद्याला शिवीगाळ केली, तसेच त्यातील आरोपीने पीडित कैद्याला मारहाणही केली. याप्रकरणी कैद्याने ना. म. जोशी मार्ग पोलिसांकडे तक्रार केली.

सोमवारी पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक अत्याचार, धमकावणे, मारहाण, केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे न्यायालयीन कारवाई करून याप्रकरणी त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

Ebola Case: काळजी वाढवणारी बातमी! काँगोहून आला अन् तब्येत बिघडली… अहमदाबादमध्ये इबोलाच्या संशयाने खळबळ, ४ जण आयसोलेट

‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत!

Latest Marathi News Live Update : विदर्भात ६ जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट

Monsoon Gains Momentum : मॉन्सूनने पुन्हा घेतली गती; अरबी समुद्र अन् बंगालच्या उपसागरातून पुढे सरकला; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT