मुंबई

Mumbai Crime: रिक्षातून प्रवास करताना बॉयफ्रेंडनं तरुणीला भोसकलं! नेमकं काय घडलंय वाचा?

रिक्षातून प्रवास करत असताना दोघांमध्ये नेमका काय वाद झाला?

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : रिक्षातून प्रवास करत असतानाच दोघांमध्ये वाद निर्माण होऊन एका तरुणीला तिच्या प्रियकरानं धारदार शस्त्रानं भोसकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात हा थरारक प्रकार घडला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Mumbai Crime While traveling in a rickshaw boyfriend stabbed his girlfriend)

एएनआयच्या वृत्तानुसार, एक ३० वर्षीय तरुणी आणि तिचा बॉयफ्रेन्ड हे दोघे साकीनाका परिसरातील खैरानी रोड येथून एका रिक्षातून जात होते. दोघांमध्ये धावत्या रिक्षातच शाब्दिक चकमक सुरु झाली. त्यानंतर त्याचं वादात रुपांतर झालं.

पण काही क्षणातचं हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी तरुणानं आपल्या मैत्रिणीच्या गळ्यावरुन धारदार चाकू फिरवला. या थरकाप उडवणाऱ्या घटनेत संबंधित तरुणीचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

पोलिसांच्या माहितीनुसार, पंचशीला जामदार आणि तिचा प्रियकर दीपक बोरसे हे सोमवारी दुपारी ऑटो रिक्षानं जात होते. रिक्षात काही कारणास्तव त्यांचा वाद सुरू झाला. रिक्षा साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर जात असताना रागाच्या भरात आरोपीनं चालत्या ऑटोरिक्षात तरुणीचा गळा चिरला. यानंतर जखमी तरुणी स्वतःच्या बचावासाठी गाडीतून खाली उतरली. पण काही अंतर गेल्यावर भोवळ येऊन ती खाली पडली. त्याचवेळी आरोपीनंही त्याच धारदार शस्त्रानं स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकानं पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोघांनाही जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे महिलेला मृत घोषित करण्यात आले, तर आरोपी प्रियकराची प्रकृती स्थिर आहे. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT