मुंबई

अँटिजेन चाचण्यांच्या प्रमाणात घट, डिसेंबर महिन्यात सर्वाधिक कमी चाचण्यांची नोंद

मिलिंद तांबे

मुंबई: कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने चाचण्यांचे प्रमाण ही कमी झाल्याचे दिसते. जलद निकालासाठी करण्यात येणाऱ्या अँटिजेन चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. डिसेंबर महिन्यात सर्वाधिक कमी चाचण्यांची नोंद झाली आहे. 

मुंबईत डिसेंबर महिन्यात एकूण  4.48 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण 2.21 इतके आहे. नोव्हेंबर महिन्यात 3.71  लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात 1.68 लाख अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. तर सप्टेंबर महिन्यात 3.51 लाख कोरोना चाचण्यांपैकी 1.09 अँटिजेन चाचण्या होत्या. 

अनलॉक शिथिल करण्या सोबत बाधित रुग्णांचे प्रमाण ही वाढू लागले. त्यामुळे पालिकेने झटपट चाचण्यांसाठी अँटीजेन चाचण्यांवर भर दिला. अँटिजेन चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण मागील काही महिन्यांत कमी झाल्याचं समोर आलं आहे.

मुंबईत दैनंदिन 15 ते 19 हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. महापालिका प्रशासनाच्या वतीनं दर दिवशी साधारणता 15 हजार आरटीपीसीआर कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. मात्र आरटी-पीसीआर चाचण्यांच्या तुलनेत अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये 100 व्यक्तींमागे पॉझिटिव्हिटी दर 10 ते 12 टक्के आहे. हे प्रमाण अँटिजेन चाचण्यांमध्ये 3 ते 4 टक्के इतके आहे. 

प्रवासी, फेरीवाले, दुकानदार यांसह अत्यावश्यक ठिकाणी अँटिजेन चाचण्यांवर अधिक भर दिला जातो. या चाचण्यांचे निकाल 10 मिनिटात येत असल्याने या चाचण्यांवर भर दिला जातो. इतर ठिकाणी आरटी-पीसीआर चाचण्यांवर भर दिला जातो. आरटी-पीसीआर चाचण्यांची अचूकता अधिक असल्याने या चाचण्यांवर अधिक भर देण्यात येत असून या चाचण्यांचे निकाल ही लवकर देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

चाचण्यांची टक्केवारी

सप्टेंबर महिन्यात 69 %
ऑक्टोबर महिन्यात 60 %
नोव्हेंबर महिन्यात 55 %
डिसेंबर महिन्यात 50 %

एकूण चाचण्या - 24 लाख 4 हजार 1
एकूण बाधित   - 2 लाख 95 हजार 240
एकूण बरे झाले - 2 लाख 75 हजार 464
एकूण सक्रिय रुग्ण - 7 हजार 771
एकूण पॉझिटिव्ह दर -12.28 

मुंबईत 15 ते 19 हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. त्यात आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण अधिक असून 15 हजार आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. त्यात आरटी-पीसीआर चाचण्यांच्या तुलनेत अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण कमी आहे.
सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त 

---------------------------------

(संपादन-पूजा विचारे)

Mumbai Decrease number antigen tests lowest recorded December

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT