Crime esakal
मुंबई

Mumbai Crime : चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन तरूणीकडून 23 लाखाची खंडणी वसूल

आपली समाजमाध्यमांवरील खासगी अकाऊंट व्यवस्थापकाला चालविण्यास देणे मुंबईतील 26 वर्षीय ज्युनियर आर्टिस्ट तरूणीला भलतेच महाग पडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

आपली समाजमाध्यमांवरील खासगी अकाऊंट व्यवस्थापकाला चालविण्यास देणे मुंबईतील 26 वर्षीय ज्युनियर आर्टिस्ट तरूणीला भलतेच महाग पडले आहे.

मुंबई - आपली समाजमाध्यमांवरील खासगी अकाऊंट व्यवस्थापकाला चालविण्यास देणे मुंबईतील 26 वर्षीय ज्युनियर आर्टिस्ट तरूणीला भलतेच महाग पडले आहे. आरोपी व्यवस्थापकाने तक्रारदार महिलेची प्रियकरासोबतची खासगी चित्रफीत वायरल करण्याची धमकी देऊन 24 लाख रुपये खंडणी उकळल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात खंडणी व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

तरुणीचा विश्वासघात

या प्रकारात तक्रारदार तरूणी मुंबईत ज्युनियर आर्टिस्ट म्हणून चित्रपट व मालिकांमध्ये काम करते. आरोपी व्यवस्थापकाने 2018 मध्ये ज्युनिअर आर्टिस्ट तरूणीच्या समाजमाध्यमांवरील अकाऊंट हाताळण्याचे आश्वासन पिडीत तरूणीला दिले होते. तरुणीने विश्वासाने समाज माध्यमांबाबतचे सर्व गोपनीय पासवर्ड व इतर माहिती व्यवस्थापकाला दिली. त्यानंतर आरोपीने तक्रारदार तरूणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले. तसेच तक्रारदार तरूणीची प्रियकरासोबतची खासगी चित्रफीत तिच्या नातेवाईकांना पाठवली व ती इतरत्र वायरल करण्याची धमकी दिली.

23 लाखांची खंडणी

त्यामुळे घाबरून तक्रारदार तरूणीने त्याला रोख 17 लाख 74 हजार रुपये व 5 लाख 10 हजार रुपये ऑनलाईन हस्तांतरित केले. त्यानंतर आरोपीने दोन मोबाइल क्रमांकावरून तरूणीला अश्लील संदेश पाठवले. त्यामुळे अखेर कंटाळून तिने याप्रकरणी शुक्रवारी अंबोली पोलिसांकडे तक्रार केली. अंबोली पोलिसांनी विनयभंग, खंडणी, धमकावणे व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या व तरूणीला पाठवण्यात आलेल्या संदेशाबाबतची माहिती समाजमाध्यम कंपन्यांकडून मागविण्यात आली. तसेच गुगल पेद्वारे पाठवलेली रक्कम स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याची पोलीस माहिती घेत असून या व्यक्तीच्या सहभागाबाबत तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Labour Law: 1 तास काम, 2 तासांचा पगार! काय आहे ओव्हरटाइमवर नवीन कामगार कायद्यातील नियम

Canva AI 2.0 लॉन्च! डिझाइनिंग वर्ल्डमध्ये धमाका; 20 पेक्षा जास्त जबरदस्त टूल्स, कसे वापरायचे? पाहा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, तापमानाचा पारा ४४ अंशावर तरी शाळा सुरूच

IND vs SA: स्मृती मानधानाने रोहित शर्मा-विराट कोहलीला मागे टाकत घडवला नवा इतिहास; T20I मध्ये ठरली अव्वल भारतीय फलंदाज

Kolhapur Gokul Dudh Sangh Clash : दिव्यांग लिपिकाला सभासदांची धक्काबुक्की; 'गोकुळ' सुनावणीला गालबोट; अधिकारी गैरहजर असल्यामुळे तणाव

SCROLL FOR NEXT