Crime sakal
मुंबई

Mumbai Crime : धावत्या दुरांतो एक्सप्रेसमध्ये फॅशन डिझायनर तरूणीचा विनयभंग!

नागपूर - सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेसमध्ये चक्क तिकीट तपासणीसाकडून एका फॅशन डिझायनर तरूणीचा विनयभंग केल्याची धक्कायदायक घटना समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेसमध्ये चक्क तिकीट तपासणीसाकडून एका फॅशन डिझायनर तरूणीचा विनयभंग केल्याची धक्कायदायक घटना समोर आली आहे.

मुंबई - नागपूर - सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेसमध्ये चक्क तिकीट तपासणीसाकडून एका फॅशन डिझायनर तरूणीचा विनयभंग केल्याची धक्कायदायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीने तपासणीसाविरोधात सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ५६ वर्षीय तिकीट तपासणीसाच्या विरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास केला जात आहेत. परंतु अद्यापही तिकीट तपासणीसा अटक झालेली नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणी ही फॅशन डिझायनर असून २५ फेब्रुवारी रोजी मुंबईहुन नागपूरला गेली होती. त्यानंतर सोमवारी पीडित तरुणी परतीचा प्रवास नागपूरहुन सीएसएमटी दिशेकडे येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातुन प्रवास करत होती. परंतु तिच्याकडे आरक्षित तिकीट नव्हती. तिकीट तपासणीसाकडून तिला तिकीटसंदर्भात विचारणा केली असता, तिने आरक्षित नसलेले तिकीट दाखवले. त्यानंतर, त्याने तिला एका आसनावर बसण्याची परवानगी दिली.

रात्री ९.१५ वाजेच्या दरम्यान, पीडित तरूणी त्या आसनावर झोपली होती. त्यानंतर तिकीट तपासनीस एक्स्प्रेसमध्ये फिरून आला तिच्या पायाला हात लावून तिला उठवले.त्यानंतर एकाच आसनावर दोघेही बसून होते. थोड्या वेळात तिकीट तपासनीस आणखी तिकीट तपासण्यासाठी गेला. त्यानंतर पुन्हा आल्यानंतर पीडित तरूणीच्या पायाला हात लावून तिला उठवले. यावेळी तरूणीला लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतर ती त्याच आसनावर एका बाजूला बसून राहिली, अशी माहिती तरूणीने पोलिसांना दिली.

पोलिसांकडून तपास सुरु -

सीएसएमटी येथे तरूणी येऊन ती गोरेगाव येथील घरी जाऊन, घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर, तरूणीने सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिकीट तपासनीस हा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातला असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूने तपास सुरू असून घडलेल्या घटनेवेळी उपस्थित असलेल्या प्रवाशांचे व इतर रेल्वे कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्यात येत आहेत, अशी माहिती सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT