Mumbai News 
मुंबई

Kalyan : हातातून निसटलं अन् नाल्यात वाहुन गेलं चार महिन्यांचं बाळ; आईचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबईत मुसळधार पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडवून दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यातच अंबरनाथ लोकल बंद पडल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान सुमारे २ तास उभी असताना काही प्रवासी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते. त्यातच एक छोटं बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई चालत होती. अचानक त्या काकाच्या हातून चार महिनाचे बाळ सटकले आणि वाहत्या पाण्यात वाहून गेलं.

मुलाची आई आणि त्याचे काका लोकल बंद पडल्याने लोकल ट्रेनच्या बाजुने चालत निघाले होते. मात्र त्याचवेळी काकाच्या हातात असलेलं चार महिन्यांचं बाळ हातातून सटकलं. ते वाहत्या पण्यात वाहून गेलं.

कोकण आणि मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन ठप्प झालं आहे. मुंबईत लोकस सेवेवरही मुसळधार पावसाचा परिणाम झाला आहे. हवामान विभागाने पुढील चोवीस तासांचा हवामान अंदाज वर्तविला आहे.

हवामान विभागाने २० जुलैसाठी दिलेल्या अलर्टनुसार, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिलं आहे. तर मुंबईसाठी यल्लो अलर्ट देण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT