Mumbai High Court Sakal media
मुंबई

आजची युवापिढी समोर असेल ते अनुभवतात, मात्र परिणामांचा विचार नाही करत- हायकोर्ट

सुनिता महामुनकर

मुंबई : आजची युवा पिढी (young generation) ही 'आता नाहीतर कधीच नाही' या मानसिकतेमध्ये (psychology) जगत आहे. त्यामुळे जे काही समोर असेल त्याच्या परिणामांचा (impact) विचार न करता ते अनुभवत असतात, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) एका निकालामध्ये व्यक्त केले आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये 9birthday party) केकमधून अमलीपदार्थ (drugs) खाल्याचा आणि बाळगल्याचा आरोप असलेल्या दोघांना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन (bail) मंजूर केला आहे.

नाशिकमधील इगतपुरी येथे एका बंगल्यात ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. कोकेन, गांजा आणि चरसचे सेवन आरोपींनी केले असा आरोप त्यांच्यावर इगतपुरी पोलिसांनी ठेवला आहे. दोन्ही आरोपींना जूनमध्ये अटक झाली आहे. आरोपींचे वय पाहता त्यांना सुधारण्यासाठी एक संधी मिळायला हवी, असे मत न्या भारती डांग्रे यांनी व्यक्त केले आहे. आजच्या काळात मद्यपान आणि अमलीपदार्थ घेणे तरुण पिढीसाठी सर्रास झाले आहे. सध्याचे आनंदी वातावरण हे 'आता नाहीतर कधीच नाही' अशा स्वरूपाचे आहे, असे त्यांना वाटते आणि त्याप्रमाणेच त्यांची जीवनशैली झाली आहे. याचे काही विपरीत परिणाम होऊ शकतात याचा विचार ते करत नाही. पण या पध्दतीचा किती वाईट परिणाम होऊ शकतो याचे भान त्यांना असायला हवे, असा स्पष्ट सल्ला न्यायालयाने दिला आहे.

इगतपुरीमध्ये एका बंगल्यात ही पार्टी झाली होती. यामध्ये सत्तावीसजण सहभागी झाले होते. पोलिसांनी छापा टाकताना नियमानुसार कारवाई केली नाही असा आरोप आरोपींच्या वतीने एड आबाद पोंडा यांनी केला. त्याच बरोबर आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाहीत, त्यामुळे त्यांना सुधारण्यासाठी संधी द्यावी, अशी विनंती पोंडा यांनी केली. तसेच पोलिसांना व्यावसायिक प्रमाण ठरेल एवढे देखील अमलीपदार्थ मिळाले नाही, असा दावा त्यांनी केला. तर आरोपींनी स्विमिंग पूलमध्ये सर्व सामान फेकले, असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला. तरुणाईमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता हे आजचे मोठे आव्हान आहे. याचा विचार व्हायला हवा. दुर्दैवाने, युवकांना आजची त्यांची क्रुती आणि उद्या त्यावर होणारे परिणाम याची संगती लागत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT