lipi rastogi end her life esakal
मुंबई

Lipi Rastogi: मंत्रालयासमोरील इमारतीत IAS अधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Mumbai Mantralay Crime News: मुंबईत आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील सुनीती नावाच्या इमारतीवरुन उडी घेऊन तरुणीने आत्महत्या केली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Crime News: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या IAS अधिकाऱ्याच्या मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंत्रालयासमोरील इमारतीवरुन उडी मारून तिने आत्महत्या केली आहे. अधिकाऱ्याची मुलगी LLB चं शिक्षण घेत होती. मुंबईतील सुनीती नावाच्या इमारतीवरुन तिने उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे.

मुंबईत आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील सुनीती नावाच्या इमारतीवरुन उडी घेऊन तरुणीने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लिपी रस्तोगी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. लिपी ही कायद्याचे शिक्षण घेत होती. लिपी रस्तोगीच्या आत्महत्येचं पाऊल उचलण्यामागचं कारणही समोर आलं आहे.

साम टिव्हीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, महाराष्ट्र कॅडरचे आएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या घरात आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी देखील सापडली आहे. रस्तोगी यांच्या मुलीचं वय २७ वर्ष आहे. विकास रस्तोगी सध्या शिक्षण विभागाचे सचिव आहेत.

लिपी रस्तोगीने आज (सोमवारी) पहाटे चार वाजता १० मजली इमारतीवरून उडी घेतली. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला आहे. उडी घेतल्यानंतर तिला तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, जीटी रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं. लिपीच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

लिपी रस्तोगी हरियाणाच्या सोनिपत येथे एलएलबीचं शिक्षण घेत होती. शैक्षणिक कामगिरीवर चिंतित असल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी महापालिका निवडणूकीत पाणी प्रश्न पेटणार

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

SCROLL FOR NEXT