मुंबई

मुंबई : विधानपरिषदेसाठी भाजपचा कोणता 'सिंह' गर्जणार?

राजहंस सिंह आणि कृपाशंकर सिंह यांच्यात होणार चुरशीचा सामना?

समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगर पालिकेमधून विधानपरिषदेवर निवडून जाणाऱ्या दोन सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार असून यात भाजपच्या दोन उमेदवारांमध्ये चुरस सुरु झाली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राजहंस सिंह आणि कृपाशंकर सिंह हे दोघेही या निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. (Mumbai-Legislative-Council-bjp-Candidate-krupashankar-singh -and-rajhansa-singh)

विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी नगरसेवक मतदान करतात आणि पहिल्या पसंतीची 77 मते मिळालेला उमेदवार निवडून येतो. भाजपकडे 83 नगरसेवकांचे बळ आहे. त्यामुळे यंदा भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्‍चित मानला जात आहे. आगामी महानगर पालिका निवडणुका लक्षात घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय चेहरा विधानपरिषदेसाठी पुढे केला जाण्याची शक्‍यता आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी उत्तर भारतीयांची मतं महत्त्वाची आहेत. त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार, पालिकेतील विरोधी पक्षनेते राजहंस सिंह या निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी इच्छूक आहेत.

काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. वास्तविक पाहता राज्यातील नेतृत्व त्यांना प्रवेश देण्यास तयार नव्हते. मात्र, कृपाशंकर सिंह यांनी थेट दिल्लीतून प्रयत्न केल्याने त्यांचा पक्षात प्रवेश झाला आहे. आता तेही विधानपरिषदेसाठी इच्छूक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासूनच ही खुर्ची मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे आता दोन्ही 'सिंह'या स्पर्धेत उतरले आहेत.

आता थेट दिल्लीवरुन निर्णय

राजहंस आणि कृपाशंकर सिंह हे दोघेही काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. राजहंस सिंह यांचे भाजपच्या राज्यातील नेत्यांशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. मात्र,आता कृपाशंकर सिंह यांच्यामुळे चुरस वाढली आहे. राज्य नेतृत्वाकडून या निवडणुकीसाठी काही इच्छूकांची नावे दिल्लीत पक्ष नेतृत्वाकडे पाठवली जातील. त्यातून एकाची अंतिम निवड दिल्लीतून होईल असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT