Mumbai Local News sakal
मुंबई

Mumbai Local Crime: धक्कादायक: धावत्या लोकलमध्ये झाला महिलेचा विनयभंग!

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local News: लोकलमध्ये गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने महिलेची छेड काढत तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. डोंबिवली ते घाटकोपर स्थानकांदरम्यान ही घटना घडली असून याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी १२ तासांच्या आत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हरिशकुमार सुदुला (वय २७) याला अटक केली आहे.

पीडित महिला ही घाटकोपर परिसरात राहण्यास आहे; तर हरिशकुमार हा विक्रोळीतील टागोर नगर परिसरात राहतो. सदर महिला ही कुटुंबासह डोंबिवली येथे नातेवाईकांकडे आली होती; तर हरीशकुमार हा डोंबिवलीत काही कामानिमित्त आला होता. सोमवारी २३ तारखेला सायंकाळच्या सुमारास ही महिला कुटुंबासह घाटकोपर येथे जाण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात आली होती.

फलाट क्रमांक ५ वरून जलद लोकलने जनरल डब्यात ती पती व मुलांसह चढत असताना हरिशकुमार याने महिलेची छेड काढली. गर्दी असल्याने महिला शांत राहिली; मात्र डब्यात गर्दीचा फायदा घेत हरिशकुमारने तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

दरम्यान, घाटकोर रेल्वे स्थानक आल्याने डब्यातून उतरतानादेखील तो महिलेची छेड काढत पळून गेला. या घटनेनंतर पीडितेने भयभीत होऊन पतीला घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पीडित विवाहितेने मंगळवारी (ता. २४) दुपारी डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. यासंदर्भात डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्याशी संपर्क साधला असता, गुन्हा दाखल होताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर त्याला विक्रोळी भागातून डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी अटक केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

दीप-ज्योतीची वाढती जवळीक तर तारिणीच्या जीवाला धोका; ‘झी मराठी’वरील मालिकांमध्ये या आठवड्यात काय घडणार?

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

निवेदिता सराफ करतात ते इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? किती ते किती वाजेपर्यंत करतात? म्हणाल्या, 'मी कायम...'

SCROLL FOR NEXT