मुंबई

अत्यंत धक्कादायक ! धावत्या लोकलमधून प्रवाशाला दिलं फेकून..

सकाळ वृत्तसेवा

सकाळच्या गर्दीत मुंबईत ट्रेन पकडणं म्हणजे जगातील सर्वात कठीण काम. अशातच अमाप गर्दीत बसायला जागा तर सोडा, नीट उभं राहणं पण कठीण होतं. अशातच धाकाबुक्की आणि भांडणं देखील नित्याची असतात. मात्र हीच भांडणं विकोपाला गेलेली देखील पाहायला मिळाली आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आज मुंबईत घडलीये.       

वादामुळे धावत्या लोकलमधून एका प्रवाशाला चक्क बाहेर  फेकण्यात आलंय. हार्बर मार्गावर लोकलमध्ये सकाळी गर्दीच्या वेळेत झालेल्या वादामुळे एका प्रवाशांला धावत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची घटना आज (ता.5) सकाळी घडली.  विजय राम गुप्ता असे या प्रवाशाचे नाव असून या जखमी प्रवाशांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मानखुर्द येथे राहत असलेल्या विजय गुप्ता (35) यांने सकाळी 9 च्या सुमारास सीएसएमटीला जाणारी लोकल पकडली. लोकलला गर्दी असताना विजय आणि अज्ञात प्रवाशांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले. अज्ञात प्रवाशाने रागाच्या भरात विजयला धावत्या लोकलमधून धक्का दिला.  या दुर्घटनेमुळे विजय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान वादाचे नेमके कारण समोर आले नसले तरी गर्दीत धक्का लागल्यामुळे भांडण झाल्याची प्राथमिक शक्यता रेल्वे पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलीसांनी अज्ञात प्रवाशाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांनी दिली.

Webtitle : mumbai local train traveller thrown out of running train

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike: सणासुदीत साखर, गूळ कडू; मिठाया, चहा महाग; मिठाईच्या दरांत ४० टक्क्यांपर्यंत वाढ; तेल, तूपही वधारले

Sangli Hindu Morcha : 'देश संविधानानं चालतोय, हिंदू समाजाचा अंत पाहू नका, अन्यथा राज्यात राहू देणार नाही'; आमदार संग्राम जगताप यांचा थेट इशारा

पहिलीच मालिका गाजली, पिंपल्ससाठी ट्रोल झाली; ‘अप्पी आमची कलेक्टर’ची शिवानी नाईक सध्या काय करते?

Marathi News Live Updates : जयशंकर २३-२४ ऑगस्टला रशिया दौऱ्यावर; लावरोव्ह यांच्यासोबत प्रादेशिक, जागतिक मुद्द्यांवर चर्चा

Supreme Court : तारीख पे तारीख बंद! सर्वोच्च न्यायालयात पहिल्याच दिवशी ४०० हून अधिक प्रकरणे निकाली; एका दिवसात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT