मुंबई

Mumbai Local Viral Video : चालत्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी महिलांची गर्दी ; वादाला फुटल तोंड

Chinmay Jagtap

मुंबई लोकलच्या एका महिला डब्यामधला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या ठिकाणी महिला भगिनी धावती लोकल पकडतांना पाहायला मिळत आहेत. यामुळे या व्हिडिओवर मुंबईकर आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

मुंबई लोकलमध्ये नेहमीच आपण वेगवेगळे व्हिडियो व्हायरल होत असतांना पाहत असतो.यातच सध्या मुंबई लोकल मधला एक व्हिडियो व्हायरल होतांना दिसत आहे. हा व्हिडियो अक्षय कटारिया नावाच्या मुलाने पोस्ट केला आहे. यात त्याने आपल्या ट्विटरवर व्हिडीयो शेअर केला आहे. यात लोकल थांबायच्या आधीच त्यामध्ये महीला चढत आहेत आणि मागे 'ये मुंबई है मेरी जान' हे गाणं लावलं आहे. तब्बल दोन मिलियन लोकांनी हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोक आपापली मतं व्यक्त करत आहेत. काहींच्या मते त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने ते हे करत आहेत. तर ऑफिस नंतर पुन्हा ट्रेनमध्ये उभे रहा ही साधी गोष्ट नसल्याचे म्हणत त्यांची बाजू लोकांनी घेतली आहे.

दुसरीकडे अशा प्रकारे आपल्या जीवाचा खेळ करू नये असे मत काहींचे आहे. आपला जीव महत्वाचा आहे. यामुळे त्याची काळजी घेतली पहीजे आहे. असे काहींचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka DGP's Misconduct : महिलेसोबत ‘डीजीपी’चे असभ्य वर्तन!, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी व्यक्त केला संताप

IND vs NZ, ODI: 'मी नाव घेणार नाही, पण...' गावसकरांनी सांगितले न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार?

Bajaj Pune Grand Tour Traffic Update : 'बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज-2'साठी २१ जानेवारीला पुण्यातील वाहतुकीत बदल!

Team India Under Gambhir: 'अजिंक्य' टीम इंडियाची घरच्या मैदानावर वाताहत; कोच गौतम गंभीरचे रिपोर्ट कार्ड पाहून बसेल धक्का!

Ambegaon Political : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का; माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश!

SCROLL FOR NEXT