kishori-pednekar.jpg 
मुंबई

'तुझ्या बापाला' टि्वटवर मुंबईच्या महापौरांनी दिलं स्पष्टीकरण

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या....

सुरज सावंत

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai mayor kishori pednekar) यांनी 'तुझ्या बापाला' या वादग्रस्त टि्वटवर (tweet row) स्पष्टीकरण दिले आहे. महापालिकेच्या लस खरेदीवर एका टि्वटर युझरने प्रश्न विचारला होता. त्यावर महापौरांनी आक्षेपार्ह शब्दांमध्ये उत्तर दिले. ते टि्वट व्हायरल झाल्यानंतर महापौरांनी लगेच डिलीट केलं. पण नेटीझन्सकडून सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येत आहे. "लशींचे कॉण्ट्रॅक्ट कुणाला दिलं, असा प्रश्न विचारणाऱ्या मुंबईकराला 'तुझ्या बापाला' असं उत्तर त्यांनी दिलं होतं. (Mumbai mayor kishori pednekar explain her side on tweet row)

आज या संपूर्ण वादावर पत्रकारांनी त्यांना विचारलं, त्यावेळी त्यांनी ‘ते ट्विट' आपण नाही तर शिवसैनिकाने केलं होतं’ असं सांगितलं. किशोरी पेडणेकर यांना मुंबईतील पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न विचारण्यात आला. "बीकेसीत मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी माझ्यासोबत शाखाप्रमुख आणि दोन कार्यकर्ते होते. कार्यक्रमात असताना मी मोबाइल माझ्याकडे ठेवत नाही. माझ्या मोबाइलला लॉक नसतो. मोबाइल पाहत असताना शिवसैनिकाने हे ट्विट केलं होतं" असं स्पष्टीकरण पेडणेकर यांनी दिलं आहे.

"तसेच, ‘ते ट्विट ' पाहिल्यानंतर ही मोठी चूक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. मी कधीही गैरवर्तन करत नाही. मी तात्काळ ते ट्विट डिलीट केलं आहे. तसंच त्या शिवसैनिकाला आईच्या मायेने बोलून "परत तुझ्या हातून असे गैरवर्तन होता कामा नये", असं सांगितलं’, असं पेडणेकर यावेळी म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PPF vs ELSS vs NPS: 5,000 रुपयांची दरमहा गुंतवल्यास कुठे मिळेल जास्त परतावा? 15 वर्षांत किती तयार होईल फंड

Ankshastra : 'या' 3 मुलांकाचे लोक असतात प्रचंड कृतघ्न; चांगुलपणाची कधीच करत नाहीत परतफेड, मित्र म्हणून मदत करण्यापूर्वी नक्की करा विचार

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात लाच घेताना महसूल सहाय्यक अधिकारी रंगेहात पकडला

Indian Railways Free journey : 'या' लोकांना रेल्वेने मोफत प्रवास करता येणार, वाचणार हजारो रुपये; काय आहे MST योजना?

MPSC Success Story: ऊसतोड मजुराच्या मुलाची जिद्दीची कमाल; तांड्यावरून न्यायालयापर्यंतचा प्रवास, ज्ञानेश्वर चव्हाण झाले न्यायाधीश!

SCROLL FOR NEXT