mumbai municipal corporation sakal
मुंबई

Mumbai News : महानगरपालिकेच्या १६ सहाय्यक आयुक्तांची भरती एमपीएससीच्या माध्यमातून

मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या पदांच अनुशेष भरून काढण्यासाठी मुंबई महानगरपीलिकेत प्रक्रियेला वेग आला आहे.

किरण कारंडे

मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या पदांच अनुशेष भरून काढण्यासाठी मुंबई महानगरपीलिकेत प्रक्रियेला वेग आला आहे.

मुंबई - मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या पदांच अनुशेष भरून काढण्यासाठी मुंबई महानगरपीलिकेत प्रक्रियेला वेग आला आहे. या रिक्त पदांच्या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) च्या माध्यमातून जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. लवकरच या १६ पदासाठीच्या बदल्यास सहाय्यक आयुक्त नेमले जातील.

साधारणपणे महिन्याभरात ही प्रक्रिया राबवून याठिकाणच्या रिक्त पदांची पूर्तता करण्यात येईल अशी माहिती पालिकेच्या अधिकार्याने दिली. या पदासाठीच्या मुलाखतीनंतर ही रिक्त पदांची भरती करण्यात येईल. कोरोनाच्या आधीपासून म्हणजे २०१६ पासून ही सहाय्यक आयुक्त पदाच्या दर्जाच्या अधिकार्‍यांची भरती झालेली नाही.

मुंबई महानगरपालिकेतील अनेक अधिकाऱ्यांना बढती मिळाली आहे. तर काही अधिकारी वर्ग निवृत्तीनंतर मोठी पोकळी या पदाच्या जागांसाठी निर्माण झाली आहे. जवळपास १२ वॉर्डात या सहाय्यक आयुक्तांची नेमणूक करण्यात येईल. तर अतिरिक्त प्रकल्पांसाठीही अधिकारी वर्गाची वाणवा आहे. सध्या तात्पुरत्या पद्धतीने कार्यकारी अभियंता वर्गाला पदोन्नती देतानाच विविध वॉर्डात या पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

अनेक ठिकाणी सहाय्यक आयुक्तांच्या अंधाधुंद पद्धतीने बदल्या करण्यात आल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामध्ये स्थानिक राजकीय दबावामुळेही या बदल्या करण्यात आल्या होत्या. काही अधिकारी वर्गाच्या अल्पावधीत बदल्या झाल्याने सामान्य प्रशासन विभागाच्या कामकाजावर राजकीय नेत्यांनीही टीकास्त्र सोडले होते. आता थेट एमपीएससीच्या माध्यामातून या जागा भरण्यासाठीच्या प्रक्रियेमुळे त्याचा परिणाम हा पालिकेच्या कारभारावर सकारात्मक होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांचं वजन ९ किलो घटलं, उपोषणाचे अवयवांवर गंभीर परिणाम; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिला इशारा

Pandharpur VIP Darshan : पहिल्याच दिवशी VIP दर्शन बंदीचा फज्जा! मुनगंटीवारांना ठेवलं वेटिंगवर, गुलाबराव पाटलांना दिलं तात्काळ दर्शन; महायुतीच्या नेत्यांमध्येच दुजाभाव?

Latest Marathi News Live Update : पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन घेतल्यास गुन्हा दाखल करणार

डॉक्टर पतीला संपवलं, ८ वर्षांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात; शेजारी डॉक्टर पत्नी मोबाईल बघत बसलेली

'आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला' उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT