mumbai municipal corporation sakal
मुंबई

Mumbai Municipal : मुंबई पालिका नेमणार ५ हजार ५७५ आशा सेविका

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य क्षेत्रात आरोग्य सुविधा सक्षमीकरणासाठी मुंबईत सुमारे ५ हजार ५७५ 'आशा' आरोग्य सेविकांची कंत्राटी तत्त्वावर नेमण्यात येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य क्षेत्रात आरोग्य सुविधा सक्षमीकरणासाठी मुंबईत सुमारे ५ हजार ५७५ 'आशा' आरोग्य सेविकांची कंत्राटी तत्त्वावर नेमण्यात येणार आहेत.

मुंबई - राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य क्षेत्रात आरोग्य सुविधा सक्षमीकरणासाठी मुंबईत सुमारे ५ हजार ५७५ 'आशा' आरोग्य सेविकांची कंत्राटी तत्त्वावर नेमण्यात येणार आहेत.

दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यावर पालिकेने भर दिला आहे. मुंबईकर नागरिकांना त्यांच्या घरानजीक आणि सहजपणे आरोग्य सेवा मिळावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून पालिकेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम सुरु केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. आता वस्ती पातळीवर गृहभेटीद्वारे राबवावयाच्या आरोग्य सेवांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे.

याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, सार्वजनिक आरोग्य खात्याच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई महानगरासाठी एकूण ५ हजार ५७५ आशा आरोग्य सेविकांची कंत्राटी व मोबदला तत्वावर नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी इच्छुक उमेदवारांकडून महानगरपालिकेने अर्ज मागविले आहेत. आशा सेविकांना दरमहा सहा हजार रूपयांपर्यंत कामावर आधारित मानधन दिले जाणार आहे.

आरोग्य विषयक कामकाजांसाठी राष्ट्रीय निकषांप्रमाणे सेविकांची आवश्यकता आहे. सद्या सुमारे १ हजार ८८ आशा सेविका, तर २ हजार ८०० आरोग्य सेविका कार्यरत आहेत. त्यामुळे आता आरोग्य खात्याची गरज लक्षात घेता, आरोग्य केंद्रात १ हजार ते १२०० लोकसंख्येसाठी व सुमारे २५० घरांसाठी एक अशा पद्धतीने या आशा स्वयंसेविकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

असे असेल कामाचे स्वरूप

आशा सेविकांना प्रामुख्याने वस्ती पातळीवर गृहभेटी देऊन सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असेल. तसेच नागरिकांमध्ये असलेले विविध आजारांचे रूग्ण, गरोदर माता व बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत प्रबोधनाची तसेच उपाययोजनांचीही जबाबदारी असणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT