मुंबई

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग लवकरच सेवेत येणार; वाचा कुठपर्यंत आले काम...

संजय घारपुरे

मुंबई ः मुंबई आणि नागपूर दरम्यानचा समृद्धी महामार्ग दीड वर्षात पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बाळासाहेब ठाकरे महामार्गामुळे मुंबई नागपूर अंतर 15 तासावरुन आठ तासावर येणार आहे. 

हा महामार्ग एकंदर 701 किलोमीटर लांब आहे. त्याचे 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. यापैकी 112 किलोमीटर मार्गावरील पक्का रस्ता तयार झाला आहे, तर 318 किलोमीटरचा कच्चा रस्ता तयार झाला असल्याचे वृत्त आहे. हा महामार्गाला मुंबई मार्गास जोडण्यासाठी इगतपूरी जवळ बोगदा करण्यासही सुरुवात झाली आहे. हा 55 हजार कोटी रुपये खर्च रुन दतायर होत असलेला महामार्ग देशातील सर्वात अत्याधुनिक असेल. 

महामार्गाचे काम एकंदर 16 विभागात सुरु आहे. दहा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्ग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व 240 लहान पूलांचे काम सुरु झाले आहे. या महामार्गाचा लाभ आसपासच्या शहरांना तसेच गावांना होण्यासाठी त्यात 24 इंटरचेंज आहेत. त्यापैकी 4 इंटरचेंजच्या कामास सुरुवात झाली आहे. दरम्यान, महामार्गाच्या दोन्ही बाजूस एकंदर 1400 किलोमीटर लांबीची भिंत उभारली जाणार आहे. त्यातील 80 मीटर भिंत पूर्ण झाली आहे.

------------------------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

Cutlet Paratha: एकदा बनवाल तर घरच्यांची फर्माईश ठरलेली! असा बनवा स्वादिष्ट कटलेट पराठा

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

अस्थिबोध : अवघड शस्त्रक्रिया; पण नियोजन अचूक!

SCROLL FOR NEXT