Mumbai News 
मुंबई

Mumbai Train News : पश्चिम रेल्वेवर १४ तासांचा मेगाब्लॉक! हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी पश्चिम रेल्वेने शनिवारी- रविवारी १४ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक पश्चिम रेल्वेच्या अप- डाऊन दोन्ही मार्गावर आणि अप -डाऊन हार्बर मार्गावर असणार आहे. त्यामुळे अनेक लोकल सेवा रद्द असणार आहे. तर मेल- एक्सप्रेसचा वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यानच्या पुल क्रमांक ४६ च्या पुनर्गर्भीकरणाच्या कामासाठी अप आणि डाऊन दोन्ही लोकल मार्गांवर तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर १४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री १२ ते रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत असणार आहे.

या ब्लॉकमुळे अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सर्व अप आणि डाऊन लोकल जलद मार्गावर चालवल्या जातील आणि प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे राम मंदिर स्थानकावर थांबणार नाही.

याशिवाय मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या सर्व हार्बर मार्गावरील सेवा वांद्रे स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. चर्चगेट ते बोरिवली स्थानकादरम्यान काही धीम्या लोकल सेवा शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील आणि परतीच्या दिशेने ही ट्रेन अंधेरीहून धावणार आहे.

या लोकल सेवा रद्द -

ब्लॉककालावधीत हार्बर मार्गावरील दुपारी १.५२ सीएसएमटी- गोरेगाव लोकल, सकाळी १०. ३७ ची पनवेल - गोरेगांव लोकल, दुपारी १२.५३ ची गोरेगाव- सीएसएमटी लोकल, दुपारी. १२.१४ ची गोरेगाव- पनवेल लोकल रद्द असणार आहे. याशिवाय दुपारी १२.१६ आणि २. ५० वाजताची चर्चगेट- बोरिवली लोकल विरारपर्यत धावणार आहे.

बोरिवलीहून दुपारी १. १४ आणि ३. ४० वाजताची बोरिवली-चर्चगेट लोकल रद्द असणार आहे. त्याऐवजी दोन अतिरिक्त जलद लोकल विरारहून चर्चगेटसाठी दुपारी १. ४५ आणि दुपारी ४. १५ वाजता सोडण्यात येणार आहे. तसेच ब्लॉकदरम्यान अप- डाऊन मार्गावरील मेल- एक्सप्रेस गाडयांना १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri 2159 Crore Investment : महाराष्ट्रात 82,655 कोटींची विक्रमी गुंतवणूक; 1.55 लाख तरुणांना मिळणार रोजगाराच्या संधी, उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

Mumbai MHADA: मुंबईत म्हाडाच्या सात मजली इमारतीचा प्लास्टर कोसळला; १७ वर्षीय मुलीसह तिघे जखमी

Mhada: उमरखाडीचा समूह पुनर्विकास, रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर मिळणार; म्हाडाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

Marathi News Live Updates : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींचा निशाणा; RSS च्या भूमिकेवर केले गंभीर आरोप

झी मराठीवर स्टार प्रवाहच्या हिरोची एन्ट्री; ‘धाकट्या सूनबाई’साठी 'या' अभिनेत्याचं नाव पक्कं?

SCROLL FOR NEXT