Mumbai Metro Sakal
मुंबई

Mumbai News : मेट्रो ३च्या पहिल्या टप्प्याचे ८८ टक्के काम पूर्ण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बहुप्रतीक्षित मुंबईतील भूमिगत मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरु आहे. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी मार्ग डिसेंबर अखेरपर्यंत मुंबईकरांसाठी खुला केला जाणार आहे. या टप्प्याचे ८८.२० टक्के काम पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई मेट्रोने दिली आहे. तर बीकेसी ते कफ परेड या मार्गाचे ७७.३ टक्के काम पूर्ण झाले आहे. ही संपूर्ण भूमिगत मेट्रोसेवा जून २०२४पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा मुंबई मेट्रोचा मानस आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे २०२३ पर्यंत मेट्रो ३ पहिला टप्पा 'आरे ते बीकेसी' हे काम ८८.२ टक्के पूर्ण झाले. यातील ओव्हरहेडचे काम ५८.८० टक्के, सर्व यंत्रणांचे काम ६६.७ टक्के, स्टेशनची उभारणी ९३.४ टक्के, भुयारीतील स्टेशनची उर्वरित कामे ९७.८ टक्के, मेट्रो मार्ग बसवणे ८९.५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

या मेट्रोच्या दुसऱ्या टप्यातील बीकेसी ते कफ परेड या मार्गिकेचे ७७.३ टक्के काम पूर्ण झाले आहे. ओव्हरहेडचे काम ४६.३० टक्के, सर्व यंत्रणांचे काम ४६.८० टक्के, स्टेशनची उभारणी ८८.७ टक्के, भुयारीतील स्टेशनची उर्वरित कामे ८८.७० टक्के, भुयारातील कामे ९५.५० टक्के, तर मुख्य मार्गातील कामे ४६.९० टक्के झाली आहेत.

आरे ते बीकेसी स्थानकांच्या प्रगतीचा आढावा

स्थानक स्थापत्य तांत्रिक कामे

आरे ३२. ५% १८%

मरोळ नाका ९८.२% ८६.७%

छत्रपती शिवाजी महाराज

विमानतळ ९३% ६९.१%

सांताक्रूझ ८९.८% ५९.२%

बीकेसी ९२.३% ६०.७%

विद्यानगरी ९२. ८% ६६.८%

छत्रपती शिवाजी महाराज

विमानतळ टी१ ९०.८% ६७.१%

सहार रोड ९०.८% ६७.१%

एमआयडीसी ९८.२% ८६.७%

सिप्झ ९७.७% ८५.८%

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT