sanjeev jaiswal ias 
मुंबई

Mumbai News : कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरण! IAS संजीव जयस्वाल यांना ईडीचे समन्स

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीने मुंबईत 15 ठिकाणी छापेमारी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच इडीने सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांना समन्स पाठवले आहे. कोविड काळात मुंबईत उभारलेल्या जंबो सेंटर्सशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या संदर्भात चौकशीसाठी जयस्वाल याना बोलावले आहे.

1996 च्या बॅचचे आयएएस अधिकारी, जयस्वाल सध्या म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कथित कोविड जंबो सेंटर घोटाळा झाला तेव्हा जयस्वाल हे मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त होते.ईडीला जयस्वाल यांचा जवाब नोंदवायचे आहे.

कोविड सेंटर्सच्या करारामध्ये निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित कंपन्यांना कंत्राटे देताना कोणते निकष पाळले गेले या बाबत ईडी जयस्वाल यांचा जवाब नोंदवण्यात येणार आहे.

मुंबईत छापेमारी

कथित जंबो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी मुंबई शहरात ईडीने तब्बल 15 ठिकाणी छापे टाकले. मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरीही ईडीच्या छापेमारी करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांच्या जवळचे असलेले सुजित पाटकर यांच्याही घरी ईडीचे पथक धडकले होते.

लाइफलाइन रुग्णालयाशी संबंधित ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले.पाटकर यांच्यासह ठाकरे गटाचे आणखी एक पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्याशी संबंधित ठिकाणीही ईडीने छापे टाकले.

तपासाचा प्रवास

कथित कोविड जंबो फील्ड सेंटर्स घोटाळ्याची ईडीची चौकशीमुंबई पोलिसांनी ऑगस्ट 2022 मध्ये आझाद मैदान पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यावर आधारित आहे.या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. ऑक्टोबर 2022 मध्ये हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. नंतर ईडीने या प्रकरणी मनी लॉड्रिंग संदर्भात चौकशी सुरु केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT