Mumbai News 
मुंबई

Mumbai News : गर्दीचा उच्चांक! एसी लोकलचे दरवाजे बंद होता होईना!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या काही दिवस एसी लोकलमधील वातानुकुलित यंत्रणा वांरवार बंद पडत असल्याने प्रवासी हैराण झाले.आता तर चक्क प्रवाशांच्या गर्दीमुळे एसी लोकलच्या खोळंबा होत असल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी कल्याण स्थानकांवर एसी लोकल हाऊसफुल्ल झाल्यामुळे प्रवासी दरवाजात अटकून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एसी लोकलचे दरवाजे बंद होण्यास विलंब झाल्याने लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते.

मुंबईत दमट हवामान त्यातच यंदा तापमानाचा पारा वाढल्याने मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी वातानुकूलित लोकलकडे धावत घेतली आहे. परंतु, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे.

सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास कल्याण स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. यावेळी स्थानकात सीएसएमटी जाणारी एसी लोकल आल्याने स्थानकातील प्रवासी या लोकलमध्ये चढण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही क्षणात ही लोकल हाऊस फुल्ल झाली. अनेक प्रवासी दरवाज्याजवळ लटकून जाण्याचा प्रयत्न करत होते.

परिणामी एसी लोकलचे दरवाजे बंद होण्यास अडचण निर्माण झाली. बराच वेळ इथे लोकल थांबवण्यात आली होती. त्यामुळे इतर लोकलची सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू होती. यांसदर्भातील फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. याबाबद रेल्वेकडे विचारणा केली असताना यांसदर्भात अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT