Mumbai News 
मुंबई

Mumbai News : मागाठाणे मेट्रो स्थानकाचे IIT करणार परीक्षण करणार; काही दिवसांपूर्वी खचला होता रस्ता

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - काही दिवसांपूर्वी खासगी विकसकांच्या चुकीमुळे मागाठाणे मेट्रो स्थानकाला लागूनच असलेल्या पर्जन्य जलवाहिनीला तडा जाऊन ही जलवाहिनी फुटली. तर दुसरीकडे स्थानकाबाहेरील रस्ता पाण्याच्या प्रवाहामुळे खचला. सुदैवाने स्थानकाची मोठी हानी टळली.

यानंतर विकसकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता स्थानकाचे आयआयटीच्या तज्ज्ञ व्यक्तींमार्फत परीक्षण करण्यात येणार आहे. स्थानकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) हा निर्णय घेतला आहे.

मेट्रो स्थानकातील उत्तरेकडील प्रवेशद्वार, सरकता जिना आणि उद्वाहकानजिकची जमीन खचल्याने सुरक्षेच्या दृष्टीने महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) तात्काळ प्रवेशद्वार, उद्वाहक आणि सरकता जिना प्रवाशांसाठी बंद केला. तर महानगरपालिकेनेही हा रस्ता तात्काळ बंद केला. महानगरपालिकेकडून विकासकाला काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देखरेखीत विकासकाकडून खोदलेल्या भागात भराव टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम करण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे. यादरम्यान मेट्रो स्थानकाच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्थानकाचे परीक्षण करण्यात येणार आहे. तर या पाहणीनंतर सुचविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rules September 2026 : एलपीजी ग्राहकांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून गॅस सिलिंडरचे ‘हे’ ५ नियम बदलणार

Hirakani Tigress Latest Update : सह्याद्रीच्या जंगलात 'हिरकणी'चा मुक्त वावर! चिपळूणच्या डोंगरात 2 महिने मुक्काम; वन विभागाचे जीपीएसवर लक्ष

Nepal Flood Rescue: मृत्यू दिसत होता; तरी धैर्य सोडले नाही!; नेपाळमधील मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतलेल्या भाविकांचे थरारक अनुभव

Marathi News Live Updates : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींचा निशाणा; RSS च्या भूमिकेवर केले गंभीर आरोप

NEET PG Exam 2026: नीट-पीजीचा पेपर गेला बरा जिल्ह्यातील चार केंद्रांवर परीक्षा; एक हजार परीक्षार्थी

SCROLL FOR NEXT