AC Train sakal media
मुंबई

Mumbai News : मुंबईकरांना दिलासा! एसी लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची नियुक्ती; कारण...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या काही महिन्यापासून पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमधील वातानुकुलित यंत्रणा वांरवार बंद पडत असल्याने प्रवासी हैराण झाले. त्यामुळे एसी लोकलमध्ये आता कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे. एसी लोकलची वातानुकुलित यंत्रणेत बिघाड होत असल्याने पश्चिम रेल्वेकडून या बिघाडावर अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत दमट हवामान त्यातच यंदा तापमानाचा पारा वाढल्याने मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी वातानुकूलित लोकलकडे धावत घेतली आहे. परंतु, पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलची वातानुकुलित क्षमता कमी आणि प्रवाशांची गर्दी जास्त असल्याने वातानुकुलित यंत्रणेत वारंवार बिघाड येत आहे. गेल्य़ा महिन्याभरात पश्चिम रेल्वेवर चार ते पाच वेळा एसी लोकमलधील वातानुकुलित यंत्रणा बंद असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

सोमवारी देखील दुपारी पश्चिम रेल्वेवरील विरार ते चर्चगेट जलद एसी लोकलमधील वातानुकुलित यंत्रणा बंद पडली होती. अखेर चर्चगेट स्थानकांवर एसी लोकल रद्द करण्याची नामुष्की पश्चिम रेल्वेवर आली होती. वातानुकुलित यंत्रणा वारंवार बंद पडत असल्याने एसी लोकल दरवाजे उघडे ठेवून चालविण्याची किंवा त्या रद्द करण्याची नामुष्की रेल्वेवर येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित होत आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांची नियुक्ती

सध्या पश्चिम रेल्वेकडे ७ एसी लोकल गाड्या आहे. दररोज एसी लोकलच्या दिवसाला ७९ फेऱ्या होतात. त्यानातून ८० ते ९० हजार प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करतात. उन्हाळता पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलची प्रवासी संख्या वाढली आहे. त्यात सतत एसी लोकलमध्ये वातानुकुलित यंत्रणा वांरवार बंद पडत असल्याने पश्चिम रेल्वेने प्रत्येक एसी रॅकमध्ये एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. तसेच एका जुन्या एसी लोकलमध्ये तब्बल ५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जर धावत्या एसी लोकलमध्ये काही बिघाड झाल्यास हे कर्मचारी प्रत्येक्ष डब्यातील वातानुकूलित यंत्रणा दुरुस्त करतात.

पश्चिम रेल्वेकडून अभ्यास

एसी लोकलच्या प्रत्येक डब्यात दोन १५ टन एसी युनिटस लावलेले आहेत. एसीचे तापमान २४ अंश सेल्सियस कायम असते. परंतु सध्याच्या उष्णतेची तीव्रता पाहता हे पुरेसे नाहीत. गर्दी आणि उन्हाळ्यामुळे तापमान २७ अंश सेल्सियसपर्यत जाते. त्यामुळे वातानुकुलित यंत्रणेवर दबाब येतो. यामुळे रेल्वेने वातानुकुलित यंत्रणेची क्षमता वाढविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. याशिवाय एसी लोकलमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडावर सुद्धा रेल्वेकडून अभ्यास सुरु आहे. अभ्यासानंतर हा अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

नव्या एसी लोकलची क्षमता वाढणार

पश्चिम रेल्वेचा अधिकाऱ्यांनी सकाळला सांगितले की, ८०० चौरस फूट लांबीच्या डब्यातील एसी प्रति चौरस मीटर आठ प्रवाशांचा क्रश लोड घेउ शकतो. परंतु पीक अवर्समध्ये हाच क्रश लोड १६ पर्यत जातो. रेल्वेच्या भाषेत याला सुपर डेन्स क्रश लोड असे म्हटले जाते. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे आता नव्या एसी लोकलची वातानुकूलित क्षमता वाढविण्यात येणार आहे. मात्र, सध्या सेवेत असलेल्या एसी लोकलची क्षमता कमी असल्याने वातानुकूल यंत्रणा बंद पडत आहे.

एसी लोकलची वातानुकुलित क्षमता कमी आणि प्रवाशांची गर्दी जास्त असल्याने वातानुकुलित यंत्रणेत वारंवार बिघाड येत आहे. त्यामुळे आम्ही एसी लोकलमध्ये कर्मचारी नियुक्ती केली आहे. तसेच वातानुकुलित यंत्रणेत बिघाड होत असल्याने पश्चिम रेल्वेकडून यावर अभ्यास करत आहे.

- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

SCROLL FOR NEXT