मुंबई

अधिसभा, अभ्यास मंडळाची निवडप्रक्रिया विद्यापीठात सुरू

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबई विद्यापीठातील अधिसभा व अभ्यास मंडळाच्या रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. गुरुवारी सायंकाळी विद्यापीठ प्रशासनाशी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. शनिवारी (ता. 2) याबाबतच्या सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासन जाहीर करील. अधिसभेच्या (सिनेट) निवडणुका जानेवारीत होणार आहेत.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा न झाल्याने दोन वर्षांपासून सिनेटच्या निवडणुका रखडल्या आहेत. विद्यापीठातील निकालांच्या दिरंगाईचा फटकाही या निवडणुकांना बसला. विद्यापीठावर बहुतांश सदस्य प्रभारी असल्याने या निवडणुकांबाबत निर्णय होत नसल्याबद्दल विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र प्र-कुलगुरूपदावर एसएनडीटी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांची नियुक्ती होताच सिनेट निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.

शनिवारी अधिसभेवर प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यापीठ अध्यापक अशा तीन घटकांच्या व अभ्यास मंडळासाठी महाविद्यालयातील विभागप्रमुखांच्या निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपातील मतदार यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीबाबत काही सूचना व बदल सुचवायचे असल्यास आवश्‍यक कागदपत्रांसह सहायक कुलसचिवांना 6 डिसेंबरपर्यंत कळवावे, असे आवाहन प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले आहे.

या निवडणुका दोन टप्प्यांत घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यापीठ अध्यापक व अभ्यास मंडळासाठी महाविद्यालयीन विभागप्रमुख अशा चार घटकांच्या प्रतिनिधींच्या निवडणुका घेतल्या जातील. दुसऱ्या टप्प्यात शिक्षक व नोंदणीकृत पदवीधर घटकांच्या निवडणुका होतील.

निवडणुकीचा कार्यक्रम -
तपशील .... अंतिम तारीख

तात्पुरती मतदार यादी - 2 डिसेंबर
आक्षेप - 6 डिसेंबर, सायंकाळी 5 पर्यंत
दुरुस्त मतदार यादी - 9 डिसेंबर
कुलगुरूंकडे अपील - 13 डिसेंबर, सायं. 5 पर्यंत

घटक ........ जागा
प्राचार्य - 10
संस्था प्रतिनिधी - 6
विद्यापीठ अध्यापक - 3
महाविद्यालयांतील विभागप्रमुख - 3
एकूण जागा- 22

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT