Breaking News  Sakal
मुंबई

Bhivandi News: भिवंडीत विद्यार्थ्याकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा! १९ आंदोलक ताब्यात

यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली.

सकाळ डिजिटल टीम

भिवंडी इथं मेरी पाठशाला या संस्थेच्यावतीनं सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आज विचित्र प्रकार पहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानं गोंधळ माजला. पोलिसांनी यावेळी १९ आंदोलकांना ताब्यात घेतलं. (Mumbai News Slogan of Pakistan Zindabad by student protestants in Bhiwandi 19 detained)

काय आहे हा प्रकार?

भिवंडी इथं गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्यांना मेरी पाठशाला या संघटनेनं पाठबळ दिलं आहे. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी या विद्यार्थ्यांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं. परंतू आज दुपारी या ठिकाणी एका विद्यार्थ्यानं भाषण देत असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यानंतर याठिकाणी हा सगळा गोंधळ सुरु झाला.

या प्रकाराची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली पहायला मिळालं. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना यावेळी सौम्य लाठीचार्जही करावा लागला. यामध्ये आतातपर्यंत १४ पुरुष आणि ५ महिला अशा १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

FDA Crime : अस्वच्छतेमुळे १० हॉटेल, बेकरींचे परवाने निलंबित

Vijeta Dahiya: कोण आहेत विजेता दहिया? बर्गर खाल्ल्यामुळे 'सीजेपी'चं प्रवक्तेपद गमावलं, व्हिडीओ झाला होता व्हायरल

Mulshi Dam Water : मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत ८ हजार १०० क्यूसेक्सने विसर्ग सुरू.....

Pune Water Supply : पुण्यात पाणी कपात नाही! महापौर मंजूषा नागपुरेंची घोषणा

SCROLL FOR NEXT