Mumbai News 
मुंबई

Mumbai News : बंदी असतानाही वाहने घेतात 'यू टर्न'; वाहतूक पोलिसांचा सूचना फलक केवळ नावाला

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेतून ठाकुर्ली उड्डाणपूलावरुन येथून स. वा. जोशी शाळेजवळ यू टर्न मारुन ठाकुर्ली दिशेला वाहन मार्गस्थ होतात. मात्र या यु टर्न वर तीन रस्त्यावरुन वाहने येत असल्याने वाहने समारोसमोर आल्याने वाद होत आहेत. शिवाय अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाही.

हे वाद टाळण्यासाठी ठाकुर्ली उड्डाणपुलावरून जोशी शाळेजवळ डावे वळण घेणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूक विभागाने प्रवेश बंद केला आहे. या मार्गावरील एक मार्गिका बंद करत त्याठिकाणी प्रवेश बंदचा सूचना फलक लावला आहे. मात्र हा फलक केवळ नावाला उरला असून वाहने आज ही तो यू टर्न घेत प्रवास करत आहेत. वाहतूक विभाग यावर काय उपाययोजना करते पहावे लागेल.

डोंबिवली पश्चिमेतून ठाकुर्ली उड्डाणपूलावरुन येणारी वाहने चोळेगावला जाण्यासाठी वल्लभभाई पटेल मार्गे बावनचाळ मार्गाचा वापर करण्याऐवजी स.वा.जोशी शाळेजवळील नेहरु रोडचा वापर करतात. उड्डाणपूला जवळच डावे वळण घेत यू टर्न मारुन वाहने चोळेगाव दिशेने जातात.

या यु टर्न च्या ठिकाणी उड्डाणपूलावरुन येणारी वाहने, जोशी शाळेकडून येणारी वाहने आणि ठाकुर्ली दिशेकडून गणपती मंदीर अथवा बावनचाळ मार्गे जाणारी वाहने येऊन मिळतात. अरुंद असा हा मार्ग असल्याने वाहने समोरासमोर येऊन अनेकदा वाहनांची टक्कर होते.

यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतात. मोठी वाहने देखील या मार्गाचा वापर करतात. ही वाहने टर्न घेताना या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. ही समस्या दै. सकाळने आपल्या वृत्ताच्या माध्यमातून सर्वात पहिले समोर आणली होती. यानंतर वाहतूक विभागाने याठिकाणी उपाययोजना करत

डोंबिवली पश्चिमेतून ठाकुर्ली उड्डाण पुलावरुन येणारी व स.वा.जोशी शाळेमार्गे येऊन ठाकुर्ली चोळेगाव मार्गे जाणारी वाहने ही उड्डाणपूल जवळ यू टर्न मारत उड्डाणपूल खालील रस्त्याचा वापर करत चोळेगाव मार्गे जात होती. हा यु टर्न जवळील रस्ता अरुण असल्याने व तिन्ही मार्गे येणारी वाहने याचा वापर करत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व वाहनांची टक्कर होत होती.

वळण घेत असताना वाहने एकमेकांना घासत किंवा प्रसंगी ठोकर देत असल्याने वाहन चालकांमध्ये नियमित वादाचे प्रसंग होत होते. याविषयी दै. सकाळ ने एप्रिल महिन्यात वृत्त प्रसारित करत या समस्येला वाचा फोडली होती.

शहर वाहतूक उप विभागाचे पोलिस निरिक्षक उमेश गित्ते यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली त्यानंतर ठाकुर्लीकडे जाणाऱ्या चालकांना पुलाजवळील वळण मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी ठाकुर्लीतून डोंबिवली पश्चिमेत, पश्चिम रेल्वे स्थानक, कानविंदे चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना एकेरी मार्गिका उपलब्ध करुन दिली आहे.

रस्त्यावर बॅरीकेट्स लावत एक मार्गिका बंद करण्यात आली आहे.बॅरिकेट्सवर वाहनांना प्रवेश बंदीचा फलक देखील लावला आहे. नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईचा इशारा वाहतूक विभागाने दिला होता.

मात्र या सूचनेकडे तसेच कारवाईकडे वाहनचालक साफ दुर्लक्ष करताना दिसत आहेत. स.वा.जोशी शाळेजवळील यू टर्न मारत वाहने आजही प्रवास करत असून या वाहनांवर आता वाहतूक विभाग कधी कारवाई करते हे पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT