water news esakal
मुंबई

Mumbai News : 'एल’ विभागातील खैरानी रोडवरील पाणी पुरवठा पुढील तीन शनिवार बंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे उप जल अभियंता (परिरक्षण) खात्यातील पूर्व उपनगरातील `एल` वॉर्ड मधील खैरानी रोडवरील जमिनीखालील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे (असल्फा आऊटलेट) तुकाराम ब्रिज ते जंगलेश्वर महादेव मंदिर या दरम्यान पुनर्वसन व मजबुतीकरणाचे काम हाती घेतले आहे.

या कामासाठी सलग १० दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यापैकी ०७ दिवसांचे काम टप्पेनिहाय पद्धतीने पूर्ण झालेले आहे व उर्वरित कामासाठी सलग ३ दिवसांचा कालावधी लागणार आहे. परंतु, नागरिकांची गैरसोय लक्षात घेता, हे काम दर शुक्रवारी दुपारी १:०० वाजल्यापासून रविवार पहाटे ०५:०० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. यास्तव, दर शनिवारी म्हणजेच दिनांक १३ मे २०२३, २० मे २०२३ व २७ मे २०२३ रोजी `एल` वॉर्ड मधील खाली नमूद केलेल्या विभागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.

‘एल पूर्व’ विभागः संघर्ष नगर, लॉयलका कंपाउंड, सुभाष नगर, भानुषालीवाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदीर, कुलकर्णीवाडी, डिसुजा कंपाउंड, लक्ष्मी नारायण रोड, जोश नगर, आजाद मार्केट. (सकाळी ८.०० ते दुपारी १.०० वा. ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, दर शनिवारी म्हणजेच १३ मे २०२३, २० मे २०२३ व २७ मे २०२३ ला पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऋषभ पंतने अर्जुन तेंडुलकरला का खेळवलं नाही?" माजी क्रिकेटपटूचा रोखठोक सवाल, म्हणाला "धोनी-रोहित कुठे अन्...

Thailand Open 2026: थायलंडमध्ये भारतीय खेळाडूंचा धुमाकूळ! सिंधू आणि लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात एन्ट्री

UPSC Success Story: पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीत यश; सोहम शेंडे यांची IFS अधिकारीपदी निवड, ग्रामीण भागातील युवकाची प्रेरणादायी यशोगाथा!

Shani Jayanti 2026 : शनि जयंतीला शनिदेवांसमोर हात जोडून नमस्कार का करू नये? मूर्तीसमोर का उभे राहू नये, जाणून घ्या

Petrol-Diesel Price Hike: इंधन दरवाढीनंतर महागाईचा भडका! भाजीपाला ते LPG पर्यंत सर्वकाही महागणार? पेट्रोल-डिझेल अजून किती वाढणार?

SCROLL FOR NEXT