central railway sakal
मुंबई

Mumbai News : मध्य रेल्वेला कसली अँलर्जी ? 'तिसऱ्या काँरीडाँरवरून लोकल सेवा चालवा' प्रवासी संघटनेची मागणी !

प्रवाशांच्या सोईप्रती दक्ष असलेले पश्चिम रेल्वे तिसऱ्या काँरीडाँरवरून अंधेरी ते विरार/डहाणू दरम्यान दिवसभरात डाऊन १६ आणि अँप १४ अशा एकूण ३० लोकलच्या फेऱ्या चालवतात.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पश्चिम रेल्वेने उपनगरीय प्रवाशांच्या सोईसाठी तिसऱ्या कॉरिडोरवर दररोज लोकल फेऱ्या चालवतात. मात्र, मध्य रेल्वेने आपल्या तिसऱ्या कॉरिडोरवर लोकल चालवत नसल्याने ठाणे ते टिटवाळा/बदलापूर दरम्यान प्रवाशांना लोकल गर्दीच्या सामना करावा लागतो आहे.

अनेकदा यासंदर्भात प्रवासी संघटनेचकडून मागणी केली आहे. मात्र, या मागणीकडे मध्य रेल्वे सर्रासपणे दुर्लक्ष करतात. पश्चिम रेल्वे तिसऱ्या काँरीडाँरवरून लोकल फेऱ्या चालवू शकते तर, मग मध्य रेल्वेला कसली अँलर्जी असा प्रश्न ? प्रवासी संघटनांनी उपस्थित केला आहे.

पश्चिम रेल्वेवर तिसरा काँरीडाँर मुंबई सेंट्रल ते माहीम एकेरी स्वरूपात आहे. पण माहीम ते खार अस्तित्वात नाही, खार ते अंधेरी एकेरी स्वरूपात तर केवळ अंधेरी ते बोरीवली दुहेरी मार्ग तयार असून, प्रवाशांच्या सोईप्रती दक्ष असलेले पश्चिम रेल्वे तिसऱ्या काँरीडाँरवरून अंधेरी ते विरार/डहाणू दरम्यान दिवसभरात डाऊन १६ आणि अँप १४ अशा एकूण ३० लोकलच्या फेऱ्या चालवतात.

त्यामुळे विरार डहाणूपर्यत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, मध्य रेल्वेवर तिसरे काँरीडाँरवरून लोकल फेऱ्या चालवत नसल्याने प्रवाशांना दररोज लोकल गर्दीच्या सामना करावा लागतो आहे.

अनेकदा प्रवासी संघटना व लोकप्रतिनिधींनी सकाळ-संध्याकाळ गर्दीच्या वेळी ठाणे ते टिटवाळा/बदलापूर दरम्यान तिसऱ्या काँरीडाँरवरून काही लोकल फेऱ्या चालवण्याची मागणी करतात. मात्र, तिसरा काँरीडाँर हा केवळ मेल/एक्सप्रेस व मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात येतात. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना लोकल गर्दीच्या सामना करावा लागत असल्याची माहिती उपनगरीय प्रवासी संघटनेने दिली आहे.

अन्यथा आंदोलन

मध्य रेल्वेने प्रवाशांची अडचण समूजन पश्चिम रेल्वे प्रमाणे तात्काळ मध्य रेल्वेच्या तिसऱ्या कॉरिडॉरवरून काही लोकल सेवा चालवाव्यात. जेणेकरून प्रवाशांची सोय होईल. अन्यथा मध्य रेल्वेविरोधात प्रवासी संघटना आंदोलन करावे लागनार अशा इशारा उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का ! ८० लाख महिलांचा लाभ बंद, आता ई-केवायसीलाही मुदवाढ नाही; नेमकं कारण काय?

Rajesh Tope: शरद पवार गटाला धक्का? राजेश टोपे खरंच भाजपमध्ये जाणार? अखेर स्वतः टोपेंनीच दिलं स्पष्ट उत्तर!

Konkan Railway: ‘वंदे भारत’, ‘तेजस’च्या फेऱ्यांत १५ जूनपासून कपात; कोकण रेल्वे मार्गावर मॉन्सून वेळापत्रक, गाड्यांच्या वेळाही बदलणार

Uttarakhand Jewellery: मॉडर्न नववधूंची पहिली पसंती! हिमालयाच्या कुशीतील 'या' ५ पारंपरिक दागिन्यांपुढे सोन्याचे हारही फिके!

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT