water cut in mumbai canceled Municipal decision rainfall in lake area mumbai sakal
मुंबई

Mumbai Water Cut News : मुंबईकरांची पाणीपुरवठ्याची वर्षभराची चिंता मिटली!

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Water Cut : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आज सकाळी सहापर्यंत १४,०५,१९० दशलक्ष लिटर म्हणजेच ९७.०७ टक्के जलसाठा जमा झाला आहे. ३६४ दिवस तो पुरणार असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईत दोन दिवस जोरदार पाऊस पडला. तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगल्या सरी बरसल्या. त्यानंतर अधूनमधून संततधार सुरू आहे. सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. सध्याच्या पावसाने तलावांच्या पाण्यात वाढ झाली आहे. तलावांमध्ये ३६४ दिवस पुरेल इतका पाणीसाठा असल्याने वर्षभराची चिंता मिटली आहे. मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकटही दूर झाले आहे. अजूनही मुंबईत आणि तलाव क्षेत्रात ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मुंबईत जुलैमध्ये पुरेसा पाऊस झाला; मात्र पूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. दहीहंडी उत्सवाच्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. दुसऱ्या दिवशीही चांगला पाऊस झाला. महिनाभर पावसाने ओढ दिल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट निर्माण झाले होते. परिणामी तलावांतील पाणीसाठा घटल्याने १० ते २० टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला जाणार होता; मात्र आता तशी वेळ येणार नाही, असे पालिकेच्या जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे.

अप्पर वैतरणा ६०३.५१ ५०२.८१

मोडकसागर १६३.१५ १६३.००

तानसा १२८.६३ १२८.५३

मध्य वैतरणा २८५.०० २८४.१३

भातसा १४२.०७ १४१.६०

विहार ८०.१२ ८०.१९

तुळशी १३९.१७ १३९.१९

- सात तलावांत १४,०५,१९० दशलक्ष लिटर पाणी

- एकूण पाणीसाठा ः९७.०७ टक्के

- जलसाठा ः ३६४ दिवस म्हणजे १२ सप्टेंबर २०२४ पर्यंत पुरणार

- विहार आणि तुळशी ः १०० टक्के

- मोडक सागर ः ९९.५२ टक्के

- तानसा ः ९८.६९ टक्के

- भातसा ः ९८.२० टक्के

- मध्य वैतरणा ः ९७.६८ टक्के

- अप्पर वैतरणा ः ९०.१९ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होणार, गणेशोत्सवासाठी प्रशासनाची खबरदारी

निवेदिता सराफ करतात ते इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? किती ते किती वाजेपर्यंत करतात? म्हणाल्या, 'मी कायम...'

Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नकवी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोलन

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

SCROLL FOR NEXT