mumbai police 
मुंबई

वर्दीतले 'जेम्स बॉण्ड'; मुंबई पोलिसांचा व्हिडीओ एकदा पाहाच!

सकाळ वृत्तसेवा

आपले पोलिस जवान म्हणजेच या बँड पथकातले जवान यांनी नवीन धून आपल्यासमोर सादर केली आहे.

मुंबई- कानून के हाथ लंबे होते है... हा संवाद अनेक चित्रपटांमध्ये आपण ऐकलाय. एखादा सस्पेन्स सिनेमा असला की त्यामध्ये हे वाक्य सर्रास असतं. आणि हे वाक्य असायलाच हवं. त्याशिवाय तपासाला मजाच येत नाही. आत्तापर्यंत आपण खाकी मधले पोलीस जवान पाहिले. पहिल्या लॉक डाऊन मध्ये हातामध्ये काठी घेऊन बेशिस्तांना सरळ करताना पाहिले. एखाद्या गुन्ह्याचा छडा काही तासांमध्ये लावताना पाहिले. इतकेच काय तर मुंबई पोलिसांच्या दहशतीमुळे आणि गुंड देश सोडून फरार झाले आहेत. मात्र आत्ता जे आम्ही तुम्हाला मुंबई पोलिसांचं रूप दाखवणार आहोत ते पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. (Maharashtra Latest News)

हे आहेत आपल्या मुंबईतले पोलीस जवान. एरवी आपण या पोलीस जवानांचा बँडपथक पाहत असतो. 26 जानेवारी असेल 15 ऑगस्ट असेल यावेळेस हे बँड पथक आपल्याला पाहायला मिळतं. देशभक्तीपर गीतं या बँड वर वाजवली जातात. अतिशय मंत्रमुग्ध करणारी धून ऐकल्यानंतर आपण कितीही तणावात असलो तर मनाला शांती मिळते. आणि एक राष्ट्रभक्तीची भावना मनामध्ये जागृत होते.

आता आपले पोलिस जवान म्हणजेच या बँड पथकातले जवान यांनी नवीन धून आपल्यासमोर सादर केली आहे. बरे ही धून तुम्ही एका इंग्रजी सिनेमांमध्ये ऐकली आहे. ही धून आहे जगप्रसिद्ध जेम्स बॉण्ड या सिनेमाची. जेव्हा जेव्हा ही धून कानावर येते तेव्हा तेव्हा एक डिटेक्टिव्ह व्यक्ती आपल्या नजरेसमोर उभाच राहतो. आपल्या पोलीस दलातील प्रत्येक जवान हा जेम्स बॉण्ड पेक्षा काही कमी नाही बरं. गुन्ह्याचा छडा हा एका मिनिटात लावतात.

गुन्ह्याचा छडा लावत असताना पोलीस काळातल्या जवानांनी जेम्स बॉण्ड ची थीम सादर केली आहे. एकदा नव्हे तर दहा वेळा ऐकावी इतकी अस्खलित वाजवले आपल्या जवानांनी. परदेशात ज्यांनी जेम्स बॉण्ड ची ही थीम तयार केली त्यांनी कोट्यावधी रुपये ही थीम तयार करण्यावर खर्च केले असतील. मात्र आपल्या पोलीस जवानांनी सहजच ही थीम तयार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT