police esakal
मुंबई

Mumbai News : पोलीस शिपायाने हॉस्पिटलच्या टॉयलेटमधून उडी मारत संपवलं जीवन; घटनेने उडाली खळबळ

मुंबई पोलिस दलातील शिपायाची नागपाडा पोलिस रुग्णालयाच्या प्रसाधनगृहाच्या खिडकीतून उडी टाकत जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रोहित कणसे

मुंबई पोलिस दलातील शिपायाची नागपाडा पोलिस रुग्णालयाच्या प्रसाधनगृहाच्या खिडकीतून उडी टाकत जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कैलास गवळी असे या पोलिस शिपाईचे नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

गवळी यांची माहिम पोलिस ठाण्यातून सशस्त्र पोलिस दल ३ वरळी येथे बदली दाखवण्यात आली होती. मात्र गवळी हे ८९ दिवस गैरहजर असल्याने त्यांना नागपाडा पोलिस रुग्णालय येथून फिट फॉर सर्टिफिकीट आणण्यास सांगितले होते. त्यावेळी गवळी यांना रुग्णालयातील डॉक्टरांनी अॅडमिट करून घेतले. १४ जानेवारी रोजी गवळी नैसर्गिक विधीसाठी गेले असताना बाथरूमच्या खिडकीतून त्यांनी उडी टाकली. यात गवळी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोकयाला मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

गवळी यांना तातडीने जवळील जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. उपचारा दरम्यान गवळी यांचा मृत्यू झाला. गवळी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नसून या प्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात कलम १७४ सीआरपीसीची नोंद पोलिसांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

SCROLL FOR NEXT