Mumbai Police sakal
मुंबई

Mumbai Police: मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या!

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Police: मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. सोबतच 2 पोलीस अधिकाऱ्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त तर 3 पोलीस अधिकाऱ्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण कर्पे यांची विशेष शाखेतून गावदेवी विभागात बदली झाली आहे. अशोक ठुबे आणि राजेश बाबशेट्टी यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देऊन त्यांची अनुक्रमे ठाण्यातून पूर्व नियंत्रण कक्ष आणि विशेष शाखा एक येथे बदली करण्यात आली आहे.

15 वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या

यासोबतच 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात विशेष शाखेचे विठ्ठल पवार यांची दहिसर पोलीस ठाणे, सागरी-एक पोलीस ठाण्याचे रोहित खोत यांची शिवडी, शसस्त्र पोलीस दलाचे मदन पाटील यांची नवघर, वाहतूक विभागाचे धनंजय सोनावणे यांची सहार.

विशेष शाखेचे राजेश नंदीमठ यांची कस्तुरबा मार्ग, सहार पोलीस ठाण्याचे संजय गोविलकर यांची वाहतूक विभाग, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे अनिल आव्हाड यांची सशस्त्र पोलीस नायगाव, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अर्जुन रजाने यांची संरक्षण व सुरक्षा, मेघवाडी पोलीस ठाण्याचे अजय क्षीरसागर यांची सशस्त्र पोलीस मरोळ, आर्थिक गुन्हे शाखेचे दत्ताराम चव्हाण यांची पश्‍चिम सायबर पोलीस ठाणे, बापूराव देशमुख यांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बदली दाखविण्यात आली आहे.

3 निरीक्षकांना बढत्या

अन्य 3 पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देऊन त्यांची बदली करणयात आली आहे. त्यात अंधेरी पोलीस ठाण्याचे उमेश मच्छिंदर यांची मेघवाडी पोलीस ठाणे, धारावीच्या नम्रता लोखंडे यांची सागरी-1 पोलीस ठाणे, टिळकनगर पोलीस ठाण्याचे राजेश शिंदे यांची ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

सहाय्यक आयुक्तची नियुक्ती

अन्य सहाय्यक पोलीस निरीक्षकांमघ्ये शशिकांत गिरी यांची मरिनड्राईव्ह, गणेश इंगळे यांची संरक्षण व सुरक्षा, विराज गिरे यांची सशस्त्र पोलीस दल, योगेश देशमुख, मोरशरील पटेल यांची आर्थिक गुन्हे शाखा, भारत साळुंखे यांची वाहतूक विभाग, पल्लवी जगदाळे यांची विशेष शाखा दोन, आणि अनिल बागुल यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पोलीस निरीक्षक संतोष कदम, एपीआय भारत माने, आनंद बागडे, सुहास माने, संदीप पिसे यांची आर्थिक गुन्हे शाखा, एपीआय रोहित नार्वेकर, अमोल गवळी, प्रकाश सावंत, दिनेश शेलार, पोलीस उपनिरीक्षक श्यामसुंदर भिसे, शितल पाटील, विकास मोरे, सागर घाडगे, इंद्रजीत शिरसाठ, निखिल शेळके, बाळासाहेब शिंदे, सुजीत म्हैधुणे, अमोल कांबळे, अमीत घोगरे, दत्तात्रय अलगुर यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT