Mumbai Police Viral Video sakal
मुंबई

Mumbai Police Viral Video: मुंबई पोलिसांनी रायगडमध्ये वाचवले गिर्यारोहकाचे प्राण; सोशल मिडियावर कौतुक

या वेळेस ट्रेकवरून खाली उतरत असताना, एका महिला ट्रेकरला जखम झाल्याचे जवानांना लक्षात आले. कोणतेही बचाव पर्याय उपलब्ध नसताना, जवानांनी त्यांच्या ट्रॅकसूटचा वापर करत तात्पुरते स्ट्रेचर बनवले. तसेच जखमी महिलेला 2 तासांत बेस कॅम्पवर आणले. त्यानंतर महिलेला वैद्यकीय मदतीसाठी योग्यरित्या रुग्णालयात हलवण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे जखमी महीला गिर्यारोहकांचे प्राण वाचले आहेत. मुंबई पोलिस दलातील क्विक रिस्पॉन्स टीमच्या जवानांनी ही कामगिरी केली आहे.रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्ल्यावर शनिवारी ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत मुंबई पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीमने जखमी महिला गिर्यारोहक्याला सुखरूप वाचवण्यात आल्याची दृश्ये आहेत. या घटने बाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुंबई पोलिसांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

शनिवारी रायगड मधील कर्नाळा किल्ल्यावर काही गिर्यारोहक ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यात एका महिला ट्रेलरला झालेल्या अपघातात महिला जखमी झाली. . पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीममध्ये नवीन भरती झालेले जवान, कर्नाळा किल्ल्यावर प्रशिक्षण घेत होते.

या वेळेस ट्रेकवरून खाली उतरत असताना, एका महिला ट्रेकरला जखम झाल्याचे जवानांना लक्षात आले. कोणतेही बचाव पर्याय उपलब्ध नसताना, जवानांनी त्यांच्या ट्रॅकसूटचा वापर करत तात्पुरते स्ट्रेचर बनवले. तसेच जखमी महिलेला 2 तासांत बेस कॅम्पवर आणले. त्यानंतर महिलेला वैद्यकीय मदतीसाठी योग्यरित्या रुग्णालयात हलवण्यात आले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या क्विक रिस्पॉन्स टीमच्या सदस्यांनी जखमी ट्रेकरला सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली.पोलिसांच्या प्रयत्नांनंतर महिलेची सुखरूप सुटका झाली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मुंबई पोलिसांकडून पोस्ट करण्यात आला आहे.या व्हिडिओमध्ये, मुंबई पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीमची एका जखमी महिलेला कर्नाळा किल्ल्याच्या जंगलातून सुखरूप घेऊन जाताना दिसत आहे. पोलीस पथक दुखापत झालेल्या महिलेला स्ट्रेचरवर काळजीपूर्वक नेताना दिसत आहेत. या घटनेनंतर मुंबई पोलिसांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT