mumbai rain sakal
मुंबई

Mumbai Rain Update : मुंबईत आज सरींवर सरी, पाणी कुठेही भरले नाही

मुंबईला झोडपून काढणारा पाऊस आज काही ठिकाणी सरी सरींनी कोसळला. सखल भागात पाणी भरले नाही. पावसाची रिपरिप सुरूच आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईला झोडपून काढणारा पाऊस आज काही ठिकाणी सरी सरींनी कोसळला. सखल भागात पाणी भरले नाही. पावसाची रिपरिप सुरूच आहे. आज दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली. 1 ऑगस्टपासून पुढील चार दिवस पावसाचा ग्रीन अॅलर्ट म्हणजे पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने जाहिर केला आहे.

मुंबईत गेले आठवडाभर दमदार पाऊस कोसळला. आकाशात ढग दाटून पावसाळी वातावरण कायम ठेवत जोरदार कोसळणा-या पावसामुळे मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून सूर्य दर्शन झालेले नाही. सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला. त्यामुळे मुंबईकरांना गैरसोयींना सामोरे जावे लागले.

आज सकाळी पावसाने रिपरिप कायम ठेवत दुपारनंतर मात्र अधून मधून काहीशी उघडीप केली. मात्र काही भागात पावसाच्या पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. आज रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवा सुरळीत होती. दरम्यान पुढील चार दिवस मुंबईत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andhra Politics: भाचीच्या लग्नात मामाचाच खोडा; चंद्राबाबू नायडू कोणाला म्हणाले ‘कंसमामा’?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT