mumbai rpf jawan falls into gap between platform and lost life at kalyan railway station  sakal
मुंबई

Mumbai News : प्रवाशांची तक्रार ऐकण्यासाठी RPF जवान गेला पण तोल गेला अन् जीव गमावला

कल्याण मधील आरपीएफ जवानाचा दुर्दैवी मृत्यू

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - एक्सप्रेस मधील प्रवाशांची तक्रार आल्याने आरपीएफ चे जवान दिलीप सोनवणे हे सोडवण्यासाठी गेले. तक्रारीचे निवारण झाले आणि तेवढ्यात गाडी सुरू झाली. चालत्या गाडीतून उतरण्याच्या नादात त्यांचा तोल गेला आणि ट्रेन खाली सापडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.कसारा स्थानकात ही घटना घडली असून दिलीप हे कल्याण येथे राहण्यास होते.

रेल्वे आरपीएफ मध्ये दिलीप सोनवणे हे नोकरीस होते. कल्याण मध्ये ते राहण्यास होते. शनिवारी रात्री ते कसारा रेल्वे स्थानकात रात्रपाळी मध्ये कार्यरत होते. सकाळी 7 च्या सुमारास एलटीटी-कानपूर एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी त्यांना मदतीसाठी हाक मारली.

तक्रारीचे निवारण करण्यासाठी दिलीप रेल्वेत चढले. तक्रारीचे निवारण झाले आणि थोड्या वेळात गाडी सुरू झाली. चालत्या ट्रेनमधून त्यांनी उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा तोल गेल्याने ते गाडी खाली सापडले. या अपघातात दिलीप यांचा मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. आरपीएफचे जवान दिलीप सोनवणे हे कुटुंबासह कल्याणमध्ये राहत होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT