coastal road  
मुंबई

Mumbai : आता समुद्रालगत बांधलेल्या दगडी भिंतीचे सर्वेक्षण; लाटांच्या परिणामांचा होणार अभ्यास

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबईतील कोस्टल रोड हा महत्वाचा प्रकल्प आहे. समुद्राचे पाणी बाहेर रस्त्यावर येऊ नये यासाठी प्रकल्पासाठी समुद्रागत ७ फूट उंच दगडांची भिंत उभारण्यात आली आहे. ही भिंत उंच उसळणाऱ्या लाटांचा मारा झेलू शकतात अशी क्षमता आहे. तरीही नुकत्याच आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा मुंबईला बसला नाही.

समुद्र किनारी लावण्यात आलेले दगड, रोज धडकणाऱ्या उंच लाटा यामुळे दगडांवर काही परिणाम झाला का याचा अभ्यास करण्यासाठी पावसाळ्यानंतर दगडांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

कोस्टल रोड प्रकल्पात प्रियदर्शनी पार्क ते वरळी दरम्यान समुद्र किनारी असलेल्या इमारती व्यवसायिक कार्यालये आदींना हानी पोहोचू नये यासाठी विशेष काळजी घेतली आहे. तसेच कोस्टल रोड प्रकल्पामुळे समुद्रातील पाणी बाहेर रस्त्यावर येऊ नये यासाठी समुद्र किनारी ट्रेट्रा पॉटची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांनी संरक्षक भिंत उभारली आहे. तरीही समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटा, वादळाचा तडाखा यामुळे ट्रेट्रा पाॅटच्या भिंतीवर काय परिणाम झाला का याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

समुद्र किनारी २ ते ८ टनांचे दगड कुंडेलवाल, सिडको, एअरपोर्ट नवी मुंबई या ठिकाणाहून आणून बसवण्यात आले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात या भिंतीवर काही परिणाम झाला का अभ्यास करण्यात येणार आहेत. जेणे करुन दगड सरकले असतील तर क्रेनच्या सहाय्याने पुन्हा बसवणे शक्य होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असा आहे कोस्टल रोड

रस्त्याची लांबी - १०.५८ कि.मी.

मार्गिका संख्या - ८ (४+४), (बोगद्यांमध्ये ३+३)

भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी – ४.३५ कि.मी.

पुलांची एकूण लांबी – २.१९ कि.मी.

बोगदे – दुहेरी बोगद्यांची लांबी - प्रत्येकी २.०७ कि.मी., ११ मीटर अंतर्गत व्यास (प्रत्येकी ३ वाहनमार्गिका)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT