railway megabloack 
मुंबई

विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लाॅक

मिलिंद तांबे

मुंबई :  मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे रविवारी (ता. 26) विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी उपनगरी भागांदरम्यान मेगाब्लाॅक करण्यात येणार आहे. तसेच, हॅकाँक ब्रिजच्या पुनर्बांधणीसाठी मुख्य मार्गावर मेजर ट्रॅफिक ब्लॉकही करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चिंचपोकळी दरम्यान सकाळी 8.40 ते दुपारी 2.10 दरम्यान चार रेल्वे मार्गांवर म्हणजेच अप व डाउन जलद मार्ग आणि अप व डाउन धिम्या मार्गांवर हा ब्लाॅक असणार आहे.

असा असेल मेगा ब्लॉक ...

 1) मुख्य मार्ग (मेन लाईन) 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला दरम्यान 
- सकाळी 8.55 ते दुपारी 1.55 या वेळेत अप व डाउन जलद मार्गांवर
- सकाळी 8.55 ते दुपारी 1.55 या वेळेत अप धीम्या मार्गावर
- सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 दरम्यान डाउन धीम्या मार्गावर
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान सर्व उपनगरी सेवा रद्द राहतील.
- मात्र, ब्लॉक कालावधीत कुर्ला ते कल्याण/कर्जत/कसारा दरम्यान विशेष सेवा चालविण्यात येतील.

 2) हार्बर लाइन 
 कुर्ला - वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी 10.20 ते दुपारी 3.20 पर्यंत 
 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 2.30 या वेळेत पनवेलसाठी सुटणा-या डाउन हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहील.
- सकाळी 9.45 ते दुपारी 2.15 या वेळेत पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणा-या अप हार्बर मार्गावरील विशेष सेवा  रद्द राहतील. 
- मात्र, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी-पनवेल विभागांत विशेष सेवा चालविल्या जातील.

संपादन : सुस्मिता वडतिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT