crime news esakal
मुंबई

Mumbai : तळीरामांचा प्रताप! दारू पिताना हटकल्याने पोलिसांवर हल्ला; आरोपींना अटक

गस्त घालणार्‍या पोलिसांशी हुज्जत घालणार्‍या चार तरुणांना मालवणी पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

अंधेरी - गस्त घालणार्‍या पोलिसांशी हुज्जत घालणार्‍या चार तरुणांना मालवणी पोलिसांनी अटक केली. या तरुणांनी पोलीस ठाण्यात भिंतीवर डोके आणि तोंड आपटून पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे.

सनी भारत गिल, समीर माजिद शेख, कुमार सिंह आणि श्रीशेष व्यकंटराव जाधव अशी या चौघांची नावे असून अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने गुरुवार २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडेतीन वाजता मालाडच्या जनकल्याणनगर, सेंट ज्यूड स्कूलजवळील म्युन्सीपल मैदानात घडली. रात्री उशिरा या ठिकाणी काही तरुण मद्यप्राशन करुन गोंधळ घालत होते.

यावेळी गस्त घालणार्‍या मालवणी पोलिसांच्या एका विशेष पथकाने त्यांना तिथे गोंधळ घालू नका, घरी निघून जा असा सल्ला दिला. यावेळी या तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांनाच शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. एका तरुणाने पोलीस शिपाई कैलास नाना मोरे यांना हाताने मारहाण केली. त्यात त्यांच्या मानेला दुखापत झाली होती. त्यानंतर या चौघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी स्वतचे डोके आणि तोंड भिंतीवर आपटून स्वतला दुखापत केली. पोलिसांना शिवीगाळ करुन त्यांनीच त्यांना मारहाण केल्याचा खोटा आरोप केला. तसेच पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.

या घटनेनंतर या चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच सनी गिल, समीर शेख, कुमार सिंह आणि श्रीशेष जाधव या चौघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Crime : माजी महिला सरपंचासह सासऱ्यांना घरात घुसून मारलं; इचलकरंजीलगत असलेल्या गावात धक्कादायक घटना, कारण ऐकून वाटेल आश्चर्य

India Farmer IDs: देशात ११ हजार किसान पहचान पत्रांचे वाटप; मुदतीच्या पाच महिने आधी उद्दिष्ट पूर्ण

रितेश आणि जिनिलिया देशमुख सहकुटुंब अजमेर शरीफ दर्ग्यावर; चादर, फुलंही चढवली; व्हिडिओ व्हायरल, नेटकरी चकीत

'Vivo Y600' लवकरच होतोय लाँच! 10,000mAh बॅटरी अन् 50 MP कॅमेरा; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये फोनच्या नावाची नोंद...

Latest Marathi News Live Update : ऑडिओ क्लिप आरोपावर मनोज जरांगे यांची रामदास कदमांवर टीका

SCROLL FOR NEXT