Mumbai  
मुंबई

Mumbai : 'त्यामुळे' पावसाळ्यापूर्वी बस स्थानकातील खड्डे बुजवण्याच्या एसटी प्रशासनाच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १ मे रोजी स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाचे लोकार्पण केले असून, त्यानुसार एसटी प्रशासनाने विभाग नियंत्रकांना पावसाळ्यापूर्वी बस स्थानकातील खड्डे बुजवण्याच्या सूचना केल्या आहे.

मुंबई सेंट्रल बस स्थानक प्रशासनाने यामध्ये आघाडी घेत खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. शिवाय, बसेस आगार परिसर, बस स्थानक स्वच्छतेचा संकल्प सुद्धा एसटी डेपो प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

राज्यात एसटीची ५८० पेक्षा जास्त बसस्थानके असून, स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानात सहभागी झाले आहे. एसटी प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी एसटी प्रशासनाने स्वच्छतेची स्पर्धा आयोजित केल्याने राज्यातील डेपो पातळीवर आता स्वच्छत दिसून येत आहे. सुमारे ५६ लाख दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या एसटी बस ने प्रवास करत असून, आता महिला, ज्येष्ठ नागरिक प्रवासी सवलतीमुळे प्रवाशांमध्ये अधिक वाढ झालेली दिसू येत आहे.

त्यामुळे या प्रवाशांना एसटीच्या प्रवासासाठी नियमितपणे टिकवून ठेवण्याचे आव्हान एसटी प्रशासनापुढे आहे. त्यामुळे सुरक्षित प्रवासासह स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष देण्याच्या सूचना बस डेपो पातळीवर देण्यात आल्या आहे.

सध्यास्थितीत खड्यांमुळे धूळ उडत असल्याने डेपो परिसरात प्रवाशांना बसण्याचे ठिकाण अस्वच्छ होत आहे. त्याशिवाय एका खड्यामुळे डेपो परिसरातील रस्ता उखडत असल्याने खड्डे अधिकच मोठे झाले आहे. परिणामी पावसाळ्यात याच खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून घाणीचे साम्राज्य बस डेपो परिसरात निर्माण होत असल्याने प्रवाशांना चिखलातून बस पकडण्यासाठी वाट काढावी लागते.

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहानग्यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने यावर्षी पावसाळ्यापूर्वी राज्यातील प्रत्येक डेपो चकाचक करण्याचे काम राज्यातील डेपो प्रशासनाने हाती घेतल्याने येत्या पावसाळ्यात एसटी प्रवाशांचा प्रवास सुसाट होण्याचा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT