Court sakal
मुंबई

Dombivali News : जागा बाधित झाली नसतानाही 2 कोटींचा मोबदला दुसऱ्या व्यक्तीला

मुंबई-वडोदरा महामार्गात जागा बाधित झाली नसतानाही त्यांच्या नावे दुसऱ्या व्यक्तीला 2 कोटी 8 लाखाचा मोबदला रक्कम वाटप करण्यात आली.

शर्मिला वाळुंज

मुंबई-वडोदरा महामार्गात जागा बाधित झाली नसतानाही त्यांच्या नावे दुसऱ्या व्यक्तीला 2 कोटी 8 लाखाचा मोबदला रक्कम वाटप करण्यात आली.

डोंबिवली - मुंबई-वडोदरा महामार्गात जागा बाधित झाली नसतानाही त्यांच्या नावे दुसऱ्या व्यक्तीला 2 कोटी 8 लाखाचा मोबदला रक्कम वाटप करण्यात आली. असल्याची तक्रार मोहम्मद मिठाईवाला यांनी कल्याण प्रांत कार्यालयाकडे केली आहे. या तक्रारीवर येत्या शुक्रवारी सुनावणी घेतली जाणार आहे. मिठाईवाला यांनी दिलेल्या संमतीपत्राच्या आधारे मोबदला वाटपाचा निर्णय घेण्यात आला असून प्राप्त तक्रारीनुसार पुन्हा सुनावणी घेतील जाणार असल्याची माहिती कल्याणचे प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी दिली आहे.

मोहम्मद मिठाईवाला हे बल्याणी येथे 2011 पासून राहत आहेत. मुंबई वडोदरा महामार्गाच्या प्रकल्पात मिठाईवाला यांची जागा बाधित होत नाही. प्रकल्पात बाधित होणारी जागा, चाळ ही त्यांची नसतानाही त्यांच्या नावावर दुसऱ्या व्यक्तीला 2 कोटी 8 लाखाचा मोबदला दिला गेला आहे. अशी तक्रार मिठाईवाला यांनी कल्याण प्रांत कार्यालय यांच्याकडे केली आहे. यासंबंधी वर्षभरापूर्वी निवाडा झाला आहे. मात्र मिठाईवाला यांनी कामानिमित्त कल्याण प्रांत कार्यालयास भेट दिली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या नावे जागा नसताना त्यांच्या नावाचा आणि फोटाचा वापर करुन प्रांत कार्यालयात संमती पत्र देत निवाडा करण्यात आला आहे. त्यांच्या नावाने अन्य दुसऱ्या व्यक्तीने मोबदला लाटला आहे.

हा निवडा त्यांच्या नावाचा गैरवापर करुन करण्यात आला असून तो रद्द करण्यात यावा. त्याच्या नावाने दिलेली 2 कोटी 8 लाख रुपयांची रक्कम सरकार दफ्तरी जमा करण्यात यावी. अशी मागणी मिठाईवाला यांनी त्यांचे वकील निलेश जाधव यांच्या माध्यमातून प्रांत कार्यालयाकडे केली आहे. याप्रकरणात पुढे काही सुनावणी लागल्यास त्यात आमचे काही नसताना आम्ही गोवले जाऊ म्हणून हा पाठपुरावा करत असल्याचे देखील मिठाईवाला यांनी सांगितले. मिठाईवाला यांचे वकील निलेश जाधव म्हणाले, प्रांत कार्यालयाकडे आम्ही तक्रार केली असून त्याविषयी सुनावणी घेण्यात येईल व योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे.

यासंदर्भात प्रांत अधिकारी भांडे पाटील यांनी सांगितले, बल्याणी येथे मिठाईवाला आणि साजिद रईस या दोघांनी जागा मालकाकडून करार करत चाळ वजा घरे बांधली होती. ही घरे मुंबई वडोदरा महामार्ग प्रकल्पात बाधित होत असल्याने मिठाईवाला यांनीच प्रांत कार्यालयाक घरांचा मोबदला मिळावा असा अर्ज केला होता. त्यांच्या मागणी अर्जानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर सर्व्हेक्षण करुन बाधित बांधकामांचे मूल्यांकन करत तो अहवाल प्रांत कार्यालयास दिला होता. त्यानुसार मिठाईवाला आणि साजिद या दोघा विकासकांनी त्यावेळी आपसात अॅग्रीमेंट करत या बांधकामाचे पैसे हे साजिद यांनी घ्यावेत असे ठरले तसा करार देखील केला आहे.

मिठाईवाला यांनी नोटरीकरून त्यांचा मोबदला रईस यांना देण्यात यावा, असे संमतीपत्र दिले आहे. त्यावर मिठाईवाला यांची स्वाक्षरी आहे. त्यानुसार मोबदला रईस यांना देण्यात आला आहे. मोबदला वाटप हा प्राप्त अधिकृत कागदपत्रांच्या आधारे करण्यात आला आहे. तरी देखील मिठाईवाला यांनी तक्रार केली आहे. तक्रारीच्या आधारे या प्रकरणात शुक्रवारी सुनावणी घेतली जाईल. त्यांनी तक्रार केल्यास मिठाईवाला यांची सही खरी आहे की नाही याची शहानिशा केली जाईल. त्यांची सही आढळून आल्यास खोटी तक्रार दिल्या प्रकरणी मिठाईवाला यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते अशी माहिती प्रांत अधिकारी भांडे पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway survey : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीपूर्वी पहाटे शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; माळशिरस तालुक्यात शेतकरी संतप्त

Paithan Murder Case: अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी शिवसेना नगरसेवकाविरुद्ध गुन्हा, पैठणमध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या

Team India T20 Captain: सूर्यकुमारला T20 कॅप्टन्सीवरून काढणार, मग भारताच्या नेतृत्वासाठी पर्याय कोण? हे तिघे शर्यतीत आघाडीवर

Donald Trump Iran War Powers : ट्रम्प यांना मोठा झटका! इराणविरोधातील संघर्ष थांबवण्यासाठी संसदेत प्रस्ताव, स्वतःच्या पक्षानेही दिला धक्का

Son kills Father Kolhapur : वडील रोज दारू पिऊन आईला मारायचे, चिकन तोडणाऱ्या मुलाने वैतागून बापालाच तोडलं; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT