Mumbaikar upset about the new train schedule 
मुंबई

मुंबईकर रेल्वेच्या नव्या वेळापत्रकाबाबत नाराज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मध्य रेल्वेच्या आगामी सुधारित वेळापत्रकात एकही नवीन लोकल फेरी नसेल. याची कुणकुण लागल्याने प्रवासी संघटनांनी सोमवार व मंगळवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

मध्य रेल्वेचे नवे उपनगरी वेळापत्रक अद्याप लागू झाले नसले, तरी त्यात नव्या फेऱ्या नसल्याचे कळल्यामुळे प्रवाशांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या ११ प्रवासी संघटनांनी ९ आणि १० डिसेंबरला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी वेळापत्रकात लोकल फेऱ्या न वाढवणे, १५ डब्यांच्या लोकलचा रखडलेला प्रकल्प, प्रवाशांच्या तक्रारीला उत्तर न देणे यांमुळे मुख्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गांवरील प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. 

तब्बल तीन महिने रखडलेल्या लोकलच्या सुधारित वेळापत्रकात पुन्हा एकदा प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. सुधारित वेळापत्रक जानेवारीत लागू होणार असले, तरी त्यात वाढीव लोकल फेऱ्यांचा समावेश नाही. सुधारित वेळापत्रक साधारणत: सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात लागू होते. रेल्वे मंडळाच्या मेल-एक्‍स्प्रेस वेळापत्रकानुसार लोकलचे वेळापत्रक आखले जाते; परंतु यंदा डिसेंबर उजाडला, तरी सुधारित वेळापत्रक अंमलात आलेले नाही. 

सुधारित वेळापत्रकात एकाही वाढीव लोकल फेरीचा समावेश नसून, काही लोकलच्या वेळेत ४ ते ५ मिनिटांचा बदल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या अडचणी आणि समस्यांबाबत वेगवेगळ्या संघटनांनी रेल्वे प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली आहेत; परंतु मध्य रेल्वेने कोणतीही दखल घेतलेली नाही. या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ ९ डिसेंबरला काळ्या फिती लावून प्रवास आणि १० डिसेंबरला आझाद मैदानात निदर्शने करून मध्य रेल्वेचा निषेध करण्यात येईल, असे उपनगरी रेल्वे प्रवासी एकता महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.

सुधारित वेळापत्रकात एकाही वाढीव लोकल फेरीचा समावेश केलेला नाही. फक्त काही लोकलच्या वेळेत ४ ते ५ मिनिटांचा बदल करण्यात आला आहे.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

प्रत्येक स्थानकावर निदर्शने 
सुधारित वेळापत्रकात आसनगावसाठी जादा लोकलची व्यवस्था न केल्यास प्रत्येक स्थानकात प्रवासी निदर्शने करतील, असे राजेश घनघाव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT