Shivsena  
मुंबई

Shivsena : मोर्चापूर्वीच ठाकरे गटाची कोंडी! पालिकेची शिवसेना ठाकरे गटाच्या वांद्रे येथील शाखेवर कारवाई

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या अनधिकृत शाखेवर महापालिकेने आज (ता. 22) धडक कारवाई केली. तेथे मोकळ्या जागेत या कार्यालयाचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले होते. गेल्या २० वर्षापूर्वी उभारण्यात आलेली ही शाखा कोणतीही नोटिस न देता तो़डण्यात आले असून ही कारवाई जाणीवपूर्वक केली जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.

ठाकरे गटाने मुंबई महापालिकेवर विराट मोर्चाची घोषणा केल्यानंतर गेल्या दोन दिवसांत शिवसेना ठाकरे गटाला लक्ष्य करीत कोंडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेनाने महापालिकेतील भ्रष्टाचार विरोधात १ जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर गेल्या दोन दिवसांत ठाकरे गटाच्या संबंधित प्रकरणात कारवाईला वेग आला आहे. आज वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातल्या मोकळ्या जागेवर ठाकरे गटाकडून अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या कार्यालयावर पालिकेने तोडक कारवाई केली.

या कारवाईला विरोध होण्याची शक्यता असल्याने पालिकेने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. हे बांधकाम करताना ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. या कार्यालयाची पालिकेकडे कोणतीही नोंदही झालेली नाही. त्यामुळे शिवसेनेची शाखा असलेले हे कार्यालय अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अन्यायकारक कारवाई

शिवसेनेची ही शाखा काल परवा उभारलेली नव्हती. महापालिकेने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. हे कार्यालय पोलीस स्टेशनच्या समोर आहे. काल बांधलेले नाही. कारवाई करण्यापूर्वी कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस द्यायला हवी होती, पण एकाएकी तोडफोड करणे हे वैरभावनेचे द्योतक आहे. हे कार्यालय जवळपास ४० वर्ष जुने आहे. एकीकडे आपण झोपड्यांना अधिकृत करत आहोत. मात्र वांद्रे पश्चिमेकडील झोपड्यांना हात लावण्याची हिंमत नसलेले हे सरकार आहे. त्यांचे एलआयसीसमोरील कार्यालय सुद्धा अनधिकृत आहे. हे कार्यालय वांद्रे पूर्वमधील शाखेपेक्षा नवीन आहे. त्यामुळे तेथेही कारवाई करा. आमची कार्यालये झोपड्यांसारखी आहेत. गोरगरिबांना सेवा देणारी कार्यालये आहेत. ही कारवाई जाणीवपूर्वक करण्यात आली आहे.

- अरविंद सावंत, खासदार (शिवसेना ठाकरे गट)

...तर या कार्य़ालयावरही कारवाई करा, ठाकरे गटाची मागणी

वांद्रे पूर्व येथील उभारण्यात आलेली शाखा पालिकेकडून तोडण्यात आली आहे. मात्र याच विभागात शिवसेना शिंदे गटाकडून काही दिवसांपूर्वी येथील नाल्यावर अनधिकृतपणे कार्यालय उभारण्यात आले आहे. या अनधिकृत कार्यालयामुळे येथील नागरिकांची गैरसोय होते आहे. पालिकेने या कार्यालयावरही कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे वांद्रे पूर्व शाखा क्रमांक १६ चे शाखा प्रमुख मोहम्मद फारुक शेख यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT