narayan rane, sanjay raut sakal
मुंबई

पापं झाकण्यासाठी शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन; नारायण राणेंचा हल्लाबोल

राऊत यांच्या स्वागतासाठी विमातळ परिसरात हजारो शिवसैनिक एकत्र आले होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) ईडीच्या कारवाईनंतर आज दिल्लीहून मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वगतासाठी लाखो शिवसेना कार्यकर्त्यांनी विमातळ परिसरात एकत्र येत राऊत यांचे ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत केले आहे. दरम्यान, कारवाईनंतर मुंबई विमानतळावर केेलेल्या शिवसेनेच्या या शक्ती प्रदर्शनावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्वीट करत टीका केली आहे. (Narayan Rane Tweet )

नारायण राणे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?? काळा पैसा मिळवायचाय, अन् कारवाई झाली की बोंबलायचं.. त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? असे म्हणत संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर? असे म्हणत त्यांनी राऊत यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.

भाजपनं महाराष्ट्रात स्वतःची कबर खोदून ठेवलीए - संजय राऊत

"हे शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन नाही. ही लोकांच्या मनातील चीड आणि संताप आहे. आज आयएनएस विक्रांतप्रकरणी जो घोटाळा झाला आहे त्याविरोधात शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानं आज महाराष्ट्रातील गावपातळीवर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन शिवसेना आणि इतर नेत्यांवर हल्ले केले जात आहेत. ही सुरुवात असून आता ठिणगी पडलेली आहे. यापुढे जसजशी भाजपची पावलं पडतील तशी आमची पावलं पडतील. मी फक्त निमित्त आहे, महाराष्ट्रात माझ्यासारख्या असंख्या राजकीय कार्यकर्त्यांवर नेत्यांवर तसेच भाजपच्या राजकीय विरोधकांवर कारवाया सुरु आहेत. पवार साहेबांनी याबाबतची तक्रार पंतप्रधानांकडं मांडली आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT