Accident News esakal
मुंबई

Navi mumbai Accident News : भरधाव ट्रकने रिक्षाला दिली धडक

Chinmay Jagtap

Navi mumbai Accident News : भरधाव ट्रकने रिक्षाला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ६) रात्री तळोजा एमआयडीसी रोडवर घडली. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे

उमेश आत्माराम पाटील (वय ३६) असे मृत रिक्षाचालकाचे नाव असून तो पनवेल तालुक्यातील वलप गाव येथे राहत होता. गत ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता उमेश हा तळोजा येथील धरणा गावात राहणाऱ्या राजू पाटील या नातेवाईकाच्या घरी गेला होता. रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास दोघेही वलप-वावंजे रोडने रिक्षाने धारणगाव येथे जात असताना त्यांची रिक्षा एमआयडीसी रोडवरील एस. एस. पाटील कॉन्ट्रॅक्टर यांच्या कार्यालयासमोर आली.

या वेळी नावडे फाटा येथून बेलनाक्याकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने रिक्षाला समोरील बाजूस धडक दिली. त्यामुळे त्यांची रिक्षा रस्त्यावर पलटी होऊन उमेश पाटील व राजू पाटील हे दोघे जखमी होऊन रिक्षात अडकून पडले. त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी त्यांची रिक्षा सरळ केली. या अपघातात उमेश पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघा जखमींना रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यापूर्वीच उमेश पाटील यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला असून तळोजा पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT